सुपा : बसस्थानक चौकातील कंटेन्मेंट झोनचा फज्जा

भाजीपाला बाजार परिसरात मोठी गर्दी
सुपा : बसस्थानक चौकातील कंटेन्मेंट झोनचा फज्जा

सुपा | वार्ताहार

संपुर्ण देशात करोनाची दुसरी लाट (Corona second wave) ओसरत आसताना पारनेर (Parner) तालुक्यात मात्र गेल्या काही दिवसापासून करोना रुग्ण वाढतच असून गेल्या महिन्याभरात जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पारनेर रोजच्या बाधीताच्या आकडेवारीत सर्वात पुढे आहे.

पारनेर तालुक्यातील करोना बाधीताची वाढत्या आकडेवारीची चर्चा राज्य पातळीवर झाल्याने जिल्हा व तालुका प्रशासन खडबडून जागे झाले असून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. यामुळे पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे (Tehsildar Jyoti Deore) यांनी दोन दिवसापुर्वीच तालुक्यातील एकवीस गावे संवेदनाशील म्हणून घोषीत केली होती. त्या गावानी कडक निर्बंध लावून रुग्णालये व मेडीकल दुकाने वगळता सर्व बंद करण्याचे आदेश दिले होते.

सुपा : बसस्थानक चौकातील कंटेन्मेंट झोनचा फज्जा
Coronavirus : जिल्ह्यातील दैनंदिन रुग्णसंख्या चारशेच्या खाली

तहसिलदार देवरे यांनी शनिवारी आणखी काही गावे बंद करण्याचे आदेश दिले. यावेळी तालुक्यातील सर्वात गर्दीचे ठिकाण असलेले सुपा बसस्थानकाचा (Supa Busstand) परिसरही कंटेन्मेंट झोन (containment zone) म्हणून घोषीत केला होता. परंतु तेथील व्यावसायिक व नागरिक दोन्हीही प्रशासनास न जुमानता सर्रासपणे वावरताना दिसत आहे. पारनेर महसुल विभाग,आरोग्य विभाग पोलिस प्रशासन व सुपा ग्रांमपचायत यांच्यात समन्वय नसल्यामुळे सुप्यातील भाजीपाला विक्रेते व फळ विक्रेते या सर्वाची डोकेदुखी झाली आहे. काही भाजी विक्रेते दुपारी चारनंतर ही व्यवसाय चालू ठेवतात, तर विक्रेते चार नंतर बाजारतळ परिसरातुन शहाजापुर चौकात आपली दुकाने थाटतात. पर्यायाने तेथे रात्री उशीरा पर्यंत गर्दी होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com