सुपा परिसरात दोन ठिकाणी दरोडा

मारहाण करत पावणे सहा लाखांचा ऐवज केला लंपास
सुपा परिसरात दोन ठिकाणी दरोडा

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Supa

सुपा गाव व परिसरात गेल्या दोन दिवसात चोरट्यांनी धुमाकुळ घातला असुन दोन घरात दरोडा टाकत पावणे सहा लाखाचा ऐवज चोरून नेला. तर एका गावच्या नळपाणी पुरवठा योजनेचा स्टार्टर पळवल्याची घटना ही घडली आहेत.

सुपा परिसरात दोन ठिकाणी दरोडा
शेततळ्यात बुडून सख्या बहीण-भावाचा दुर्दैवी मृत्यू

सुपे येथील अपधूप रस्त्यावरील एम.आय.डी.सी. सबस्टेशन जवळील राजाराम फंड यांच्या बंगल्याचा दरवाजा तोडून मारहाण करीत सुमारे पावणेचार लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी त्यांनी सुपा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार 6 मे रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास तीन ते चार अज्ञात दरोडेखाराांनी फंड यांच्या बंगल्याचे दार तोडून बंगल्यात प्रवेश केला. त्यांनी राजाराम फंड यांच्या डोळयात मिरचीची पुड टाकून लाथा बुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. दहशत निर्माण करून चोरटयांनी तिघांजवळील मोबाईल ताब्यात घेतले. नंदीनी फंड यांनी त्यांच्या गळयातील मीनी गंठण, व कानातील सोन्याची फुले काढून चोरट्यांच्या हवाली केले. दरम्यानच्या काळात दोन चोरटयांनी बेडरुमध्ये जाऊन तेथील लोखंडी कपाट उघडून कपाटातील सोन्याचे पाच तोळयांचे गंठण, सोन्याच्या बाळया तसेच रोख रक्कम ताब्यात घेतली.

सुपा परिसरात दोन ठिकाणी दरोडा
सत्तेसाठी उड्या मारणारे दगडावर आपटले

कपाटातील बँक लॉकरच्या चाव्या तसेच सोन्याच्या दागिन्यांच्या पावत्याही चोरटयांनी लांबविल्या. ऐवज ताब्यात घेतल्यानंतर चोरटयांनी पुन्हा राजाराम फंड यांच्या पायावर लाकडी दांडक्याने मारहाण करीत त्यांना जखमी केले. दरोडेखोरांनी टी शर्ट व हाप पॅन्ट परीधान केलेली होती. 20 ते 25 वयोगटातील मध्यम बांध्याचे व त्यांनी तों कापड बांधून चेहरे झाकलेले होते. चोरटयांनी चोरलेले लॅपटॉप तसेच तिन्ही मोबाईल पोलिसांच्या हाती लागले असून चोरटयांचा लवकरच शोध लागेल.

सुपा परिसरात दोन ठिकाणी दरोडा
नगरमध्ये गर्भपाताच्या गोळ्यांचा साठा जप्त

तसेच सुपे परिसरातील खडकवाडी येथील बाबासाहेब रामभाऊ पवार यांच्या राहत्या घरात घुसून अज्ञात दरोडेखोरांनी एक लाख रुपये चोरून नेल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. पहाटे 3.30 ते 3.50 या विस मिनिटांच्या कालावधीत अज्ञात चोरटयाने घरात घुसून एक लाख रुपयांची रक्कम हस्तगत केली. मिळालेल्या माहीतीनुसार पवार हे पहाटे लघुशंकेसाठी घराबाहेर पडले. घराचा दरवाजा लोटून ते गेले असता अज्ञात चोरट्याने तीच संधी साधून तो घरात घुसला. घरातील सामानाची उचकापाचक करून घरात ठेवलेली एक लाख रुपयांची रक्कम घेऊन चोरटा पसार झाला. बाबासाहेब पवार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटयाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

बाबुर्डीच्या पाणी योजनेच्या स्टार्टरची चोरी

बाबुर्डी गावास पाणीपुरवठा करणार्‍या पाणी योजनेची मोटारीचा स्टार्टर चोरटयांनी चोरून नेल्याची घटनाही घडली आहे. बाबुर्डी ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी शांताराम आनंदराव लगड यांनी यासंदर्भात सुपे पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलीसांना आव्हान

सुपा शहरात औद्योगिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात बाहेरचे नागरिकांनी आले आहेत. अनेक भाडेकरूंची नोंद कोठेच नाही. यातीलच काही फेरीवाले बनुन दिवसभर छोटी मोठी विक्री करण्याच्या नावाखाली दिवसभर पहाणी करतात व रात्री चोरी करत असल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे. या दरोडेखोरांना रोखण्याचे पोलीसांपुढे आव्हान आहे.

Related Stories

No stories found.