सुपा परिसरात मध्यम स्वरुपाचा पाऊस

उकाड्यापासुन दिलासा
सुपा परिसरात मध्यम स्वरुपाचा पाऊस

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

शनिवारी दुपारनंतर पारनेर तालुक्यातील काही भागात पाऊस पडला असुन नागरिकांना उकाड्यापासुन थोडा दिलासा मिळाला आहे.

शनिवारी सकाळ पासुनच चांगले उकडत होते. तापमान 38 अंशाच्या आसपास होते. दिवसभर चांगले उकडल्यानंतर दुपारी दोन नंतर ढग जमायला सुरूवात झाली. व 2.30 नंतर प्रत्यक्ष पावसास सुरवात झाली. सुरूवातीला शांत पडत असलेल्या पावसामध्येच जोरदार वारा वाहवू लागला. त्यामुळे रस्त्याने ऐ जा करणारे नागरिक व मोटार सायकलवरील नागरिकांना पावसाने चांगलेच झोडपले. साधारणपणे आर्धातास सुपा व लगतच्या काही गावांनी पाऊस झाला असुन कांदा, आंबा, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. तर शेतातील पालेभाज्या जनावरांचा चारा व फुलशेतीच्या पिकांना यामुळे मोठा आधार मिळाला आसुन इतर पिकांना जीवदान मिळाले आहे.

जुन महिना चालू झाल्यावर शेतकरी शेतीच्या खरीप हंगामाला सुरूवात करतात, गेल्या चारपाच दिवसात पावसाची काही चिन्हे न दिसल्याने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. पाऊस लांबणार असे हवामान खात्याने जाहिर केल्याने शेतकर्‍यांनीही मशागतीची कामे थांबवली होती. आज थोड्या फार प्रमाणात पावसास सुरूवात झाल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या पावसाने शेतातील ढेकळ फुटण्यास मदत होणार असुन पेरणी पुर्व कामांना वेग येणार आहे. पाऊस पडता झाल्याने शेतकरी खते बी बियानांच्या चौकशीला लागला असुन या थोड्या फार पावसाने रानात चरणार्‍या जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.

शनिवारी दुपारी पाऊस झाल्यानंतर परिसरात उकाडा चांगला जानवत होता. तर आभाळात ढग जमलेले दिसत होते. तर पाऊस पडण्यास सुरूवात झाली म्हणून शेतकरी सुखावलेला दिसत होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com