सुपा परिसरात अवकाळी पाऊस

काढणीला आलेल्या कांद्याचे नुकसान
सुपा परिसरात अवकाळी पाऊस

सुपा |वार्ताहर| Supa

पारनेर तालुक्यातील सुपा परिसरात बहुतांशी ठिकाणी शनिवारी रात्री व सोमवारी दुपार नंतर अवकाळी पावसाने हजरी लावल्याने काढणी योग्य आलेल्या कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शेतकर्‍याने मोठ्या कष्टाने पिकविलेला कांदा पिकाची काढणी सुरू झाली आहे. त्यात आता अवकाळी पावसाने काही दिवसांपासून जोर धरला आहे. यामुळे काढून जमिनीमध्ये साठवून ठेवलेल्या कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. एप्रिल महिना सुरू असल्याने उकाडा वाढला आहे. यामुळे गेल्या काही दिवसापासुन अवकाळी पावसाने रंग दाखवायला सुरवात केली आहे.

एप्रिल, मे महिना हा साधारणपणे कांदा काढणीचा कालावधी असतो. या दिवसात उन्हाळी कांद्याची काढणी करून बाजारभाव असल्यास विक्री केली जाते किंवा कांदा चाळीत साठवला जातो. परंतु गेल्या काही दिवसांपासून वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. काढलेला कांदा गोळा करणे, गोळा केलेला कांदा झाकने, जोराच्या वादळी वार्‍यामुळे बळीराजाची मोठी ताराबळ होते.

चालू वर्षी दिर्घ काळ पाऊस पडल्याने कांदा रोपांचे मोठे नुकसान झाले. 12 ते 15 हजार रुपये पायलीचे बी घेतले. मजुरी, खते, औषधे ऐवढे सर्व खर्च करून पिकवलेला कांद्याचे पावसामुळे नुकसान झाले आहे.

15 ते 20 रुपयापर्यंत किलोमागे उत्पादन खर्च आलेल्या कांद्याला आज रोजी दहा रुपये किलोचा भाव आहे, त्यामुळे बहुतांशी शेतकरी कांदा काढुन साठवण्याच्या मनस्थितीत आसताना अवकाळी पाऊस शेतकर्‍यांच्या कष्टावर पाणी फेरीत आहे. दोन तीन वेळा कांदा रोप टाकून पिकवलेला कांदा हातातोंडाशी आलेला घास आवकाळी पावसामुळे हिसकवला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com