चारचाकी वहानाच्या धडकेने पादचारी ठार

नगर-पुणे महामार्गावरील घटना
चारचाकी वहानाच्या धडकेने पादचारी ठार

पारनेर | तालुका प्रतिनिधी

अहमदनगर पुणे महामार्गावर पळवे शिवारात चारचाकी वहानाची धडक बसुन पादचारी ठार झाला असुन चारचाकी चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत राहुल विलास गाडीलकर (रा.पळवे खुर्द) यांनी सुपा पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गुरुवार (दि १३ आँक्टोबर २०२२) रोजी दुपारी ३.०० वाजनेच्या आसपास अहमदनगर पुणे महामार्गावर हाँटेल नगरी तडका पळवे खूर्द शिवारात एक ३५ ते ४० वर्षे वयाची व्यक्ती रस्ता ओलांडत असतांना त्याच वेळी महामार्गावरुन वेगाने येत आसलेली क्रेटा गाडी क्रमांक MH 17 BV 3040 या गाडीची सदर पादचार्याला जोराची धडक बसली व तो व्यक्ती जबर जखमी झाला. घटनेची माहिती सुपा पोलिसांना दिल्यावर सुपा पोलिसांनी व सदर गाडीचालकाच्या मदतीने जखमी व्यक्तीला अहमदनगर सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले.

जखमी झालेल्या व्यक्तीवर उपचार चालू असताना दुसऱ्या दिवशी म्हणजे सदर व्यक्तीचे निधन झाले. सुपा पोलिसांनी राहुल गाडीलकर यांच्या फिर्यादीवरुन व सिव्हिल रुग्णालयाच्या अहवालावरुन गाडी चालक संजय ठकाजी नान्नोरे (रा.डिग्रस) यांच्या विरुध गुन्हा दाखल केला आहे.

सदर मृत व्यक्ती पुरुष ३५ ते ४० वर्षे वयाची असुन असुन याविषयी कुणाला काही माहिती आसल्यास सुपा पोलिसासी संपर्क करावे असे आवाहन सुपा पोलिसांनी केले आहे .पोलिस निरिक्षक नितीनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली साह्यक फौजदार सुनिल कुटे पुढील तपास करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com