सुप्यासह पारनेर तालुक्यात आठ दिवसापासून विजेचा खेळखंडोबा

नागरिक झाले त्रस्त
सुप्यासह पारनेर तालुक्यात आठ दिवसापासून विजेचा खेळखंडोबा

पारनेर ( तालुका प्रतिनिधी)

पारनेर तालुक्यात आठ दिवसांपासून विज वितरणात सतत बिघाड होत असल्याने पुरवठ्यावर मोठा परिणाम होत आहोत परिणामी नागरिक विजेअभावी हैराण झाले आहेत.

आठ दिवसापासून पारनेर तालुक्यात कमी जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यात आठ दिवस झाले विजेच्या दिवसभर लंपडाव चालू असतो. सुपा पारनेर या मोठ्या शहरासह ग्रामीण भागात दिवसदिवस वीज गायण असते. वीज कार्यालयात विचारणा केली असता थांतुरमातुर उत्तरे देऊन बोळवन केली जाते. तर रोज वसुलीला दारोदार फिरणारे लाईनमनही गेल्या आठ दिवसांपासून गायव आहेत.

गेल्या आठ दिवसांपासुन नियमित विज पुरवठा होत नसल्यामुळे घरातील पिण्याच्या पाण्यापासुन व्यावसायिकाचे मोठे नुकसान होत आहे. सध्या नवरात्र उत्सव चालू आहे, अगोदरच करोनामुळे गेल्या दीड वर्षापासून व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत. आता कुठे थोडे फार चालू होऊन गाडी रुळावर येऊ पहात असताना विज वितरणच्या गलथनपणामुळे सर्वानच मनस्थाप होत आहे. गणेश उत्सवातही अशाच विजेने लपणडाव खेळलात आता पर्यत नवरात्रात परत मागचे दिवस पुढे आले आहेत.

सुपा शहरासह परिसरातील गावांनी गेल्या आठ दिवसांपासून रोज विजेचा लंपनडाव चालू आहे. सुपा शहरातील व्यावसायिक तर विजेच्या बाबातीत खुपच त्रासलेले दिसत आहेत. आधी गेल्या दिड वर्षापासून व्यावसाय मोठ्या तोट्यात गेलेले असताना त्यात आता सणवाराच्या मुहूर्तावर आशेचा किरण असतांना त्याला विजवितरणचे ग्रहण लागले आहे.

सुप्यात शनिवारी काही नागरिकांनी जाहीर नाराजी व्यक्त करत नेहमीच उत्सव काळात कशी विज कशी जाते असे म्हणत रोष व्यक्त केला. विजाच्या कडकडाटामुळे विज जाते, असे विज कर्मचारी सांगत असले तरी वस्तुस्थितीत गावा बाहेरील बाजूने विजेचा अनाधिकृतपणे वापर करण्यात येत असून त्याचा परिणाम लोडवर होवून वारंवार विज गायब होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com