सुपा येथे मनसे कार्यकर्त्यांची धरपकड

मशिदीसमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न
सुपा येथे मनसे कार्यकर्त्यांची धरपकड

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

तालुक्यातील सुपा गावात मशिदीपुढे अंदोलन करणार्‍या मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. त्यांना ताब्यात घेऊन नंतर समज देऊन सोडण्यात आले.

सुपा येथिल मशिदीवरील भोगे खाली उतरावेत या मागणीसाठी गुरुवारी (दि.5) दुपारी 12.00 वाजता पारनेर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सुप्यातील मशीदीपुढे साऊंड लावून अंदोलन करण्याचा प्रयत्न मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्याबाबत तीन तारखेचा अल्टिमेंट दिला होता. यानंतर जर भोंगे उतरवले नाही तर मशिदीपुढे मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावण्याचे आदेश दिले होते. त्या अनुशंगाने पारनेर तालुक्यातील मनसे पदाधिकार्र्‍यांनी गुरुवारी दुपारी सुपा येथील मशिदीसमोर अंदोलन करण्याचे जाहीर केले.

तशे त्यांनी प्रसारमाध्यमाना कळवले होते. मनसेचे पदाधिकारी मशिदीकडे येत आसताना सुपा पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कलम 68 अतर्गत या सर्व अंदोलनकर्त्याना ताब्यात घेतले यावेळी मनसे तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार म्हणाले, आमचा कुणाच्या धर्माला किंवा पुजेला विरोध नाही आहे. फक्त कोर्टाच्या नियमांचे पालन व्हायला हवे कायद्याचे पालन सर्वानी करायला हवे जशी आमच्या वर कारवाई झाली तशी मशिदी वर कधी करणार. सुप्यात बुधवारी मोठ्या आवाजात आजान झाले असे पवार म्हणाले. यावेळी सुपा पोलिसांनी अविनाश पवार नितीन म्हस्के.अक्षय सुर्यवंशी ज्ञानदेव पवार यांना ताब्यात घेऊन सुपा पोलिस स्टेशनला नेले . तेथे सांयकाळी समज देऊन सोडून देण्यात आले.

आमचा कुणाच्या धर्माला किंवा पुजेला विरोध नाही. फक्त कोर्टाच्या नियमांचे पालन व्हायला हवे, कायद्याचे पालन सर्वांनी करायला हवे, जशी आमच्यावर कारवाई झाली तशी मशिदीवर कधी करणार दुटप्पी भूमिका योग्य नाही.

- अविनाश पवार, मनसे तालुका उप अध्यक्ष पारनेर.

Related Stories

No stories found.