सुपा औद्योगिक वसाहतीत कामगारावर चाकू हल्ला

पोलीसांनी एकाला घेतले ताब्यात
सुपा औद्योगिक वसाहतीत कामगारावर चाकू हल्ला

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

सुपा औद्योगिक वसाहतीतील (Supa MIDC) नविन म्हसणे फाटा एमआयडीसीमधील (Mhasane Phata MIDC ) माय डीया कॅरीअर कंपनीच्या (Midea) गेटवर कामगारावर खुनी हल्ला झाला असुन यात कामगार गंभीर जखमी (Worker Injured) झाला आहे.

सुपा औद्योगिक वसाहतीत कामगारावर चाकू हल्ला
प्राध्यापकांसाठी यापुढे संवर्गनिहाय आरक्षण, शासन अध्यादेश जारी

याबाबत कंपनीतील कामगारांनी सांगितले की, माय डीया कॅरीअर (Midea Carrier) कंपनीच्या गेटजवळ गाडी पार्क करण्याच्या कारणावरून वाद (Dispute) झाला. चिराग रोहिदास जाधव (वय 21 रा.पळवे खुर्द ता. पारनेर) याने ओंकार नंदू रावडे (वय 21 रा. नारायणगाव्हाण) या कामगाराच्या पोटावर चांकूने वार (Knife Attack) केला. यात रावडेच्या पोटाला गंभीर जखम झाली असुन सदर जखमीस सुपा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.

सुपा औद्योगिक वसाहतीत कामगारावर चाकू हल्ला
कुकडी डाव्या कालव्यातून 22 मे पासून आवर्तन

घटनेची माहिती कळताच सुपा पोलिस स्टेशनच्या (Supa Police Station) पोलिस निरिक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलिस स्टेशनचे साहाय्यक पोलिस निरिक्षक तुळशीराम पवार, खंडेराव शिंदे, यशवंत ठोंबरे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपी जाधव यास ताब्यात घेऊन सुपा पोलिस स्टेशनला (Supa Police Station) नेले अशी माहिती तेथील कामगारांनी दिली आहे.

सुपा औद्योगिक वसाहतीत कामगारावर चाकू हल्ला
नगरच्या मनपाची महासभा गाजली ठेकेदारांवर!
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com