
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
सुपा (Supa) परिसरातील सराईत काळे टोळीवर (Kale Gang) सहा महिन्या करीता हद्दपार (Deportation) करण्याची कारवाई करण्यात आले असून तसे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला (SP Rakesh Ola) यानी दिले आहेत. टोळी प्रमुख आदिक अजगण काळे (46, रा. म्हसणे, ता. पारनेर) (2) पिंटी आदिक काळे (35), समीर आदिक काळे (22, रा. म्हसणे ता. पारनेर) यासह इतर सहकारी अशी हद्यपार (Deportation) केलेल्या संशयिताची नावे आहेत.
या कौटुंबिक टोळीवर सुपा पोलीस स्टेशन (Supa Police Station) हद्यीतीत व परिसरात घातक शस्त्रे, चाकु, तलवार, लाकडी दांडके इत्यादी घातक हत्यारे नेहमी जवळ बाळगून सर्व सामान्य नागरीकांना मारहाण करणे, धमकावणे, शिवीगाळ करणे, दगडाने मारहाण करणे, गंभीर दुखापत करणे, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, जिवे ठार मारणे, जिवे ठार मारण्याची धमकी देणे, विश्वास संपादन करुन कट रचुन स्वस्तात सोने देतो असे अमिष दाखवून रोख रक्कम व मोबाईल हॅण्डसेट व चिजवस्तु बळजबरीने काढुन घेणे, गैरकायदयाची मंडळी जमवुन घातक शस्त्राने मारहाण करणे अशा विविध प्रकारचे सुपा पोलीस स्टेशनला (Supa Police Station) विविध गुन्हे दाखल आहेत.
सुपा परिसर व औद्योगिक वसाहत परिसरात मागील काही दिवसात या टोळीने (Gang) अनेक गुन्हे केल्याचे उघड झाले होते. या गुन्हेगारावर सुपा पोलिस स्टेशनला (Supa Police Station) अनेक गुन्हाची नोंद आहे. गुन्हे करणार्या आरोपींवर प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने त्यांना जिल्ह्यातून हद्यपार केले आहे.
संघटीतपणे गुन्हेगारी टोळीचा बिमोड करण्यासाठी अशा प्रकारे गुन्हे करणार्या टोळी विरुध्द माहिती संकलीत करुन विविध गुन्हेगारी टोळयांविरुध्द हद्यपारीची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे संकेत जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला (SP Rakesh Ola) यांनी दिलेले आहेत. जिल्हा पोलिस अधिक्षकानी केलेल्या कारवाई मुळे या गुन्हेगारावर चाप बसेल असे बोलले जात आहे.