करोना लसीसाठी सुप्यात उडाली झुंबड

करोना लसीसाठी सुप्यात उडाली झुंबड

संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनासह नागरिकही झाले सतर्क

सुपा |वार्ताहर| Supa

करोनाच्या (Covid 19) संभाव्य तिसर्‍या लाटेच्या (Third Wave) भीतीमुळे सुप्यात (Supa) शुक्रवारी लसीकरणासाठी (Vaccination) मोठी झुंबड उडाली. लस न मिळाल्याने काही नागरिकांना परत जावे लागले.

सुपा आरोग्य केंद्रात (Supa Health Center) शुक्रवारी (दि. 16) लसीकरण (Vaccination) होणार होते. नागरिकांनी सकाळी सात वाजल्यापासूनच आरोग्य केंद्रावर गर्दी (Crowd at the Health Center) करायला सुरुवात केली होती. आरोग्य केंद्रावर 250 डोस उपलब्ध झाले होते. परंतु त्या तुलनेत कमालीची गर्दी झाली होती. आपला नंबर यावा म्हणून दिवसभर आरोग्य केंद्रावर मोठी झुंबड उडाली होती. अनेक वेळा आरोग्य कर्मचारी व नागरिकांची बाचाबाची होत होती. अशा वातावरणात नागरिकांना 250 डोस देण्यात आले.

यावेळी दुसर्‍या डोसवाल्या नागरिकांना प्राधान्य देण्यात आले. त्यानंतर 45 प्लस व त्यानंतर इतर नागरिकांना लस देण्यात आली. करोनाच्या दुसर्‍या लाटेत सुपा शहरासह परिसरातील गावांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मृत्यू दरही मोठा होता. लवकरच करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने नागरिकांनी या तिसर्‍या लाटेचा धसका घेतला आहे. या संभाव्य तिसर्‍या लाटेच्या भितीमुळेच आज नागरिकांनी लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी केली होती.

रूई छत्रपती आरोग्य केंद्राअंंतर्गत (Rui Chhatrapati Health Center) 13 गावे येत असून यातील 1863 नागरिकांना दोन्ही डोस दिले गेले आहेत.साडेचार हजार नागरिकांना करोनाचा पहिला डोस दिला गेला. असे सर्व मिळून रूई छत्रपती आरोग्य केंद्राअंतर्गत जवळजवळ साडेसहा हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले, अशी माहिती रूई आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. भटू यांनी दिली. यावेळी डॉ. संकेत मोरे, प्रविण शिंदे, साठे भाऊसाहेब, डॉ. निलेश कोल्हे, डॉ. हेमंत शिंदे, डॉ. विद्या बारवकर, डॉ. नितीन कोल्हे, मनोहर गायकवाड, विजय भोईर, जीवन म्हेत्रे, महेंद्र मोटे, अंजली वर्पे यांच्यासह नर्स व आशा सेविका उपस्थित होत्या.

सुप्यात शुक्रवारी लसीकरणासाठी झालेली गर्दी पाहता दाट लोकवस्तीचा विचार करून येथे लस उपलब्ध झाल्यावर नियमित लसीकरण ठेवावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

रूई छत्रपती आरोग्य केंद्राअंतर्गत येणार्‍या 13 गावांत 27 ते 30 टक्के लसीकरण झाले असून जसजशी लस उपलब्ध होईल तसे रोटेशन पद्धतीने लसीकरण सुरू आहे. दुसर्‍या डोसच्या नागरिकांना प्राधान्य दिले जाते.

- डॉ. भटू अशोक भोई, मुख्य आरोग्य अधिकारी, रूई छत्रपती

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com