सुप्यात बँकेच्या बाहेर नागरिकांची गर्दी

करोना संसर्गाचा धोका : बँक प्रशासनाचे दुर्लक्ष
सुप्यात बँकेच्या बाहेर नागरिकांची गर्दी

सुपा (वार्ताहर) - येथील सेंट्रल बँकेच्या बेजबाबदारपणाचा ग्राहकांना मोठा फटका बसत आहे. शुक्रवारी भर उन्हात ग्राहक बँकेच्या दारात गर्दी करून उभे होते.

सुप्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सुपा ग्रामपंचायतीने गाव पुर्ण बंद केले आहे. करोना साखळी तोडण्यासाठी प्रशासन मेहनत घेत आहे. मात्र सेंट्रल बँक करोना वाढीला चांगलेच खतपाणी घालत आहे. गेल्या वर्षापासुन बँकेने ग्राहकांना सुरक्षित सेवा देता येईल अशी कोणतीही उपाय योजना केली नाही. शुक्रवारी दुपारी बँकेच्या बाहेर गर्दी असल्याचे चित्र होते. बँकेच्या दारात उभे असलेल्या मध्ये सुरक्षित अंतर नव्हते. तर यात काही जेष्ठ व्यक्तींचा समावेश होता.

यामुळे करोनाचा प्रसार होण्याची भिती व्यक्त होत आहे. सुपा सेंट्रल बँकेला यापुर्वीही पोलीस प्रशासन व ग्रामपंचाय अधिकारी व पदाधिकार्‍यांनी तंबी दिली होती. बँकेत औषध फवारणी केली होती. परंतु बँकेचे अधिकारी ग्राहकाच्या सुरक्षेकडे सोयीस्कर पणे दुर्लक्ष करताना दिसत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com