सुप्यात कुर्‍हाडीने एकाची निर्घृण हत्या

सुप्यात कुर्‍हाडीने एकाची निर्घृण हत्या

तुम्ही चोर्‍या करत जाऊ नका, म्हटल्याचा राग

सुपा|वार्ताहर|Supa

चोरी करण्यास विरोध केल्याने तिघांनी सुपा येथे एका व्यक्तीची कुर्‍हाड, भाला, लाकडी दांडक्यानी मारहाण करत धिसीम निचकी घिसाडी (वय 50) या इसमाची निर्घृण हत्या केली.

याबाबत पाशम धिसीम घिसाडी (वय 25, रा. सुपा) यांनी सोमवार 13 जुलै रोजी सुपा पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी व माझे पती सुपा येथे भंगार सामान विकण्याचा छोटा धंदा करत आहोत. आमच्या शेजारी काही कुंटुब रहात होते.

त्यांच्या काही संशयास्पद हालचाली पाहून माझे पती त्यांना म्हणाले ‘तुम्ही चोर्‍या करत जाऊ नको, त्याच्या आम्हाला त्रास होतो’ असे समजावून सांगितल्याचा राग येऊन त्यांनी रात्री 7.30 च्या दरम्यान वल्ली व्यंकेस भोसले, शेकू व्यंकेस भोसले व रुक्मिणी व्यंकेश भोसले यांनी आमच्या राहत्या घरासमोरच शिविगाळ करत जबर मारहाण केली. मारहाण इतकी जोरदार होती की ते जागीच शांत झाले होते. अशी फिर्याद दिली.

सुपा पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी भेट देत मारहाण झालेल्या व्यक्तीला तात्काळ पारनेर ग्रामीण रुग्णालयात पाठवले तेथे ते मूत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांनी घटना स्थळावरून कुर्‍हाड, भाला, लाकडी दांडके जप्त केले आहे. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तीनही आरोपी फरार झाले आहेत. घटनेचे गांभीर्य पाहता सुपा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रांजेंद्र भोसले पुढील तपास करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com