नारायगव्हाणचे माजी सरपंच राजाराम शेळके यांची निर्घृण हत्या

नारायगव्हाणचे माजी सरपंच राजाराम शेळके यांची निर्घृण हत्या

सुपा | वार्ताहर

नारायणगव्हाण सेवा सहकारी संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष प्रकाश कांडेकर यांच्या हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले व सध्या पॅरोलवर सुटका झालेले नारायणगव्हाणचे माजी सरपंच राजाराम शेळके यांची गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली.

शेळके हे त्यांच्या शेतात काम करत होते. दुपारी एकच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्ला झाला त्यावेळी शेळके एकटेच होते. धारदार शस्त्राने गळ्यावर वार केल्याने त्यांच्या मानेला गंभीर जखम झाली. त्यांना तातडीने शिरुर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले.

नारायगव्हाणचे माजी सरपंच राजाराम शेळके यांची निर्घृण हत्या
तीन तरूणांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला

आजची घटनेला मागील एका गुन्ह्याची झालर तर नाही ना, अशी चर्चा परिसरात होत आहे. 13 नोव्हेंबर 2010 रोजी पुणे-नगर रोडवरून नारायण गव्हाण शिवारातून जात असताना दोन अज्ञात व्यक्तींनी डोक्यात गोळ्या झाडून प्रकाश कांडेकर यांची हत्या केली होती. या हत्येमुळे तालक्यात खळबळ माजली होती. कांडेकर यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणले असता त्यांच्या डोक्यातील गोळी गायब करण्यात आली होती.

स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक अशोक रजपूत यांनी 14 आरोपींना अटक करून दोषारोपपत्र दाखल केले होते. चौकशीत राजाराम शेळके मुख्य सूत्रधार असल्याचे सिद्ध झाले होते. त्यांच्यासह कांडेकर खून प्रकरणात आणखी काही आरोपी होते. राजाराम शेळके आणि त्यांच्या मुलाला या गुन्ह्यात शिक्षा झाली होती. करोना संसर्ग वाढल्याने त्यांना पॅरोलवर सोडण्यात आले होते. पॅरोलवर असताना त्यांनी आपल्या शेतात काम चालू केले होते. शेळके यांचा आज झालेला खून म्हणजे बदला घेतल्याचाच प्रकार असल्याची चर्चा परिसरात झडत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com