सुपा बसस्थानक अतिक्रमणाच्या विळख्यात

सुपा बसस्थानक अतिक्रमणाच्या विळख्यात

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

अहमदनगर - पुणे महामार्गावरील सुपा बस स्थानक व चौक अतिक्रमणने गिळकृत केले असुन थेट रस्त्यावर दुकाने आल्याने मोठ्या अपघाताना निमंत्रण दिले जात आहे.

महामार्गाच्या दोन्ही बाजुने ठराविक अंतर हे सुरक्षेसाठी साडलेले असते परंतु सुप्यात मात्र सर्रास डांबरी रोडवर अतिक्रमणे आली आसुन यामुळे याठिकाणी वहाने दुकानात घुसुन मोठे आपघात झाले आहेत. आताही दुकाने दुकानाचे बोर्ड व पुढील शेड डांबरी रस्ताची सिमा ओलांडून पुढे आले आहेत. सुपा बस स्थानक चौकात तर चारही बाजुनी अतिक्रणे वाढतच चालली नवीन प्रवाशांना बसस्थानक शोधत बसावे लागते. याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग, एसटी महामंडळ व संबंधित विभागांचे सोयीस्कर दुरलक्ष्य होत आहे. बस स्थानकात एसटी बस येत नसल्याने त्या परिसराचा वापर वडाप, रिक्षा तसेच इतर वाहनांसाठी पार्कीग म्हणून यार्स वापर चालू असतो.

सुपा बस स्थानक चौकात अनेकांनी सरकारी अथवा सार्वजनिक जागेत अतिक्रमण करुन टपर्‍या टाकल्य असुन त्या परप्रांतियांना मोठ्या रक्कमा घेऊन भांडे तंत्वावर दिल्या आहेत. तर काही आतिक्रमनात अवैद्य धंदे चालतात. कधीकधी या संपुर्ण चौकात वहाने आडवी लावलेली आसतात यामुळे एसटी बस चालकाची इच्छा असुनही स्थानकात येता येत नाही .पर्यायाने त्या रस्तावर थांबतात यामुळे शाळेतील मुले वृद्ध अंपग याचेे मोठी हाल होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागानी व एसटी महामंडळानी आपआपली हद्द निश्चित करून हे अतिक्रमन काढावे आशी नागरिकांची मागणी आहे.

टपरी भाडे तत्वार देणे धंदा जोरात

सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करुन तेथे टपरी टाकायची व ती परप्रांतीयांना मोठ्या रक्कमेला भांडे तंत्वावर द्यायची हा फुकटात पैसे कमवण्याचा धंदा सुप्यात जोरात चालू आहे. अशात अतिक्रमण कलेल्या ठिकाणी परप्रांतियाचे धंदे चौकात मुख्य ठिकाणी आहेत. ही अतिक्रमणे काढण्याची मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com