सुप्यात दारूसह तीन दुकाने फोडली

चोरट्यांची चैनेच्या वस्तुवर डल्ला मरत केली मौज मजा
सुप्यात दारूसह तीन दुकाने फोडली

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

सुपा गावात सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकुळ घालत दारू दुकानासह तीन दुकाने फोडली. दुकानातच दारूवर ताव मारत चोरट्याीं चंगळ केल्याचे दिसून आले.

सुप्यात सोमवारी रात्री चोरानी वाळवणे रोडवरील ऐश्वर्य दारु दुकान एक मेडीकल दुकान व एक पान दुकान फोडले यात चोरड्यानी चौनीच्या वस्तुवर डल्ला मारला तर मोठी तोडाफोड करत नुकसानही केले .वाळवणे रोड वरील ऐश्वर्य परमिट रुम व शेजारील देशी दारुचे दुकान फोडले तेथे चोरानी बियरसह इतर दारुच्या काही बाटल्या आर्धाल्या पिवून फेकुन दिल्या. यानंतर दहा दारुचे बाँक्सही पळवले असे व्यवस्थापकानी सांगितले,

याच वेळी चोरानी शेजारील मेडीकलचे दुकान फोडले यात त्यांनी काँप्युटरची तोडफोड करत सी.पी.ओ पळवून नेला .तशेच चोरानी शेजारील पानाचे दुकान फोडले तेथे त्यांनी शिगारेट .तंबाखू पुडे घुटका मावा अशे चौनेचे साहित्य पळवले. दरम्यान चोरानी पुणे रोडवरील माजी ग्रांमपंचायत सदस्यच्या घरी ही हजेरी लावली होती. परंतु तेथील घरातील मंडळी जागी झाल्याने पुढील अनर्थ टळला सदर , सदस्यनी तात्काळ सुपा पोलिसाना माहिती दिली. याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com