ऐन उन्हाळ्यात दुधाचे दर घटले

पशुखाद्य व वैरणीची दरवाढ || दुध उत्पादक शेतकरी हैराण
ऐन उन्हाळ्यात दुधाचे दर घटले

पिंपरी निर्मळ |वार्ताहर|Pimpari Nirmal

उन्हाळ्यात टंचाई काळ असल्याने दुधाचे भाव वाढलेले असतात. यावर्षी मात्र उलटे गणीत झाले आहे. ऐन उन्हाळ्याच्या तडाख्यात दुधाचे दर तिन ते चार रुपयांनी कमी झाले आहे. पशुखाद्य व वैरणीचा वाढलेला खर्च व पडलेले दुधाचे दर यामुळे दूध उत्पादक शेतकरी पुरता हैराण झाल्याचे चित्र आहे.

ऐन उन्हाळ्यात दुधाचे दर घटले
विखे ज्या पक्षात जातात त्या विरोधात काम करतात

गेल्या काही दिवसांपर्यंत दुधाचे दर 3.5, 8.5 या गुणवत्तेला 37 रुपयांपर्यंत होते. भाव काहीसे बरे असल्यामुळे व उन्हाळ्यात आणखी वाढण्याची शक्यता वाटत असल्यामुळे पशुधनाच्या बाजारात गायींच्या किमंती प्रचंड वाढल्या होत्या. इतर कोणताही व्यवसाय नसल्यामुळे अनेक तरुणांनी बँकांचे कर्ज घेऊन दुग्ध व्यवसाय पदार्पण केले आहे. महागड्या गायी, गोठा व इतर बांबीवर मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांनी गुंतवणुक केली आहे. पावसाळा व हिवाळ्यात घरच्या शेतातील चारा असल्यामुळे हा व्यवसाय काही प्रमाणात परवडणारा वाटत होता.

ऐन उन्हाळ्यात दुधाचे दर घटले
दोन दिवसांत रोष्टरनुसार झेडपीच्या रिक्त जागांचा तपशील जाहीर होणार!

मात्र उन्हाळ्याची चाहुल लागल्यानंतर विकतचा चारा तसेच पशुखाद्याचे वाढलेले भाव, औषधोपचारांचा वाढता खर्च यामुळे दुग्ध व्यवसाय काहीसा अडचणीत आला होता. त्यातच गेल्या काही दिवसांपासून दुधाच्या भावात तीन ते चार रुपयांची घसरण झाल्यामुळे हा दुग्ध व्यवसाय आतबट्ट्याचा झाला असल्याने शेतकर्‍यांमध्ये शासकीय धोरणाबाबत असंतोष दिसून येत आहे. शासनाने दुधाच्या पडलेल्या बाजारभावामध्ये हस्तक्षेप करून दुधासाठी थेट अनुदानाच्या धर्तीवर ठोस योजना आखण्याची गरज असल्याची मागणी दूध उत्पादक शेतकर्‍यांमधून होत आहे.

ऐन उन्हाळ्यात दुधाचे दर घटले
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले शिर्डीतील पाच आरोपी जेरबंद

पूर्वी शेतीला जोड धंदा म्हणुन शेतकरी दूध व्यवसायाकडे पाहत होता. मात्र मध्यतरी वाढलेल्या दरांमुळे शेतकरी अधुनिक पद्धतीने दुध व्यावसायाकडे वळला आहे. पंजाब, हरीयाणा सारख्या राज्यातून उच्च प्रतिच्या महागड्या गायी, मुक्त गोठा, अधुनिक तंत्रज्ञान याचा वापर करत आहे. मात्र शेतमालाच्या भावाप्रमाणेच दुधाचे भावही स्थिर राहत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत येत आहे. सरकारने भाव स्थिर राहण्यासाठी व दरवर्षी वाढत्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत दुधाचे दर वाढविण्यासाठी योग्य ते धोरण आखण्याची आवश्यकता असल्याची प्रतिक्रीया या क्षेत्रातिल जाणकाराकडुन व्यक्त होत आहे.

ऐन उन्हाळ्यात दुधाचे दर घटले
कृषी अधिकार्‍याचे कार्यालयातीलच महिलेसोबतचे अश्लील चाळे व्हायरल
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com