राहाता बाजार समितीत उन्हाळी आणि लाल कांद्याची आवक

राहाता बाजार समितीत उन्हाळी आणि लाल कांद्याची आवक

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) काल शुक्रवारी लाल आणि उन्हाळी या दोन्ही कांद्याची आवक (Onion Inward) झाली. कांद्याच्या (Onion) 5241 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल उन्हाळी कांद्याला (Summer onions) जास्तीत जास्त 2500 तर लाल कांद्याला (onion) 2700 रुपये इतका भाव मिळाला. तसेच सोयाबीनला (Soybean) जास्तीत जास्त 5375 रुपये इतका भाव मिळाला.

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) 5 हजार 241 कांद्याच्या गोण्यांची आवक झाली. उन्हाळी कांदा नंबर 1 ला 2200 ते 2500 रुपये तर लाल कांद्याला 2300 ते 2700 असा भाव मिळाला. कांदा उन्हाळी (Summer onions) नंबर 2 ला 1550 ते 2150 रुपये लाल कांद्याला 1650 ते 2250 रुपये भाव मिळाला. कांदा (onion) नंबर 3 ला उन्हाळी 700 ते 1500 रुपये तर लाल कांद्याला (Onion) 800 ते 1600 भाव मिळाला. गोल्टी उन्हाळी कांद्याला (Onion) 1800 ते 2000 रुपये व लाल कांद्याला 1900 ते 2100 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला (उन्हाळी व लाल) 100 ते 600 रुपये भाव मिळाला.

डाळींबाच्या (Pomegranate) 712 क्रेटसची आवक झाली. डाळींब (Pomegranate) नंबर 1 ला 121 ते 155 रुपये असा भाव मिळाला. डाळींब नंबर 2 ला 91 ते 120 रुपये असा भाव मिळाला. डाळींब नंबर 3 ला 46 ते 90 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 45 रुपये भाव मिळाला.

सोयाबीनची (Soybean) 21 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला (Soybean) कमीत कमी 5200 ते जास्तीत जास्त 5375 रुपये भाव मिळाला तर सरासरी 5300 असा भाव क्विंटलला मिळाला. मकाला (Corn) 1499 रुपये प्रतिक्विंटलला मिळाले. हरबरा डंकी 4000 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. तर सिताफळाच्या 48 क्रेटसची आवक झाली. सिताफळास कमीत एका क्विंटलला 2500 तर जास्तीत जास्त 4500 रुपये व सरासरी 3500 रुपये असा भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com