सुजित झावरे यांच्या 'या' कामाची राज्यपालांनी घेतली दखल

सुजित झावरे यांच्या 'या' कामाची राज्यपालांनी घेतली दखल

पारनेर |प्रतिनिधी| Parner

पारनेर (Parner) येथील सुजित झावरे (Sujit Zaware) यांनी राबवलेल्या राज्यस्तरावर नदीजोड प्रकल्पाची (River Project) दखल घेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी झावरे यांच्या कामाचे कौतुक करत त त्यांचा सन्मान केला.

पारनेर तालुका (Parner Taluka) हा राज्यातील दुष्काळी तालुका समजला जातो.काही दिवसांपूर्वी पारनेर तालुक्यातील झावरे (Sujit Zaware) यांनी नदीचे (River),ओहोळाचे वाया जाणारे पाणी जर एकत्र केले तर अनेक पाझर तलाव, बंधारे भरुन शेतकरी वर्गाला फायदा होईल, अशी संकल्पना घेऊन त्यांनी नदीजोड प्रकल्प (River Project) संकल्पना प्रत्यक्ष कृतीत आणली. सुरुवातीला अनेकांनी त्याची खिल्ली उडविली. परंतु त्यांनी तालुक्यातील काळकूप, पाडळी याठिकाणी हा नदीजोड प्रकल्प कुठलेही विद्युत उपकरण तसेच यंत्र न वापरता केवळ नैसर्गिक उताराच्या सहाय्याने कार्यान्वित केला.

त्याची फलनिष्पत्ती अशी की पहिल्याच पावसात प्रयोग यशस्वी झाल्यानंतर दोन पाझर तलाव व आठ बंधारे भरुन गेले. राज्यपाल यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून अशा पध्दतीचे नाविन्यपूर्ण प्रकल्प राबविण्यासाठी स्वतंत्र बजेट निर्माण करावे, तसेच गावे जलसंधारण बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी कार्यवाही करावी, याबाबत आदेश दिले आहे. याप्रसंगी झारखंड फाऊंडेशनचे चेअरमन तथा माजी मंत्री शिव प्रतापसिंह, पारनेरचे युवा नेते भाऊसाहेब महाराज, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिवसुदेश झावरे पाटील आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com