
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
हरेगाव येथील घटनेतील मुख्य आरोपीस त्वरीत अटक करण्यात यावी, या मागणीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर उपोषण सुरू आहे. यादरम्यान पोलिसांसमोर एकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी शहर पोलिसात दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरेगाव येथील चार मुलांच्या मारहाण प्रकरणातील आरोपी नाना गलांडे हा प्रसार असून त्याच्या अटकेची अनेक संघटनांकडून मागणी करण्यात येत आहे. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर देवळाली प्रवरा येथील प्रदीप थोरात यांनी सहकार्यांसमवेत तीन दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. काल पोलीस उपाधीक्षक डॉ.बसवराज शिवपूजे सहकार्यांसह उपोषणकर्त्यांची चर्चा करण्यासाठी गेले होते.
चर्चा सुरू असतानाच विजय उर्फ पिंटूनाना दत्तू साळवे याने अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस कर्मचार्यांनी वेळेत त्याला पकडल्याने अनर्थ टळला. याप्रकरणी पोलीस हवालदार सोमनाथ गाडेकर यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून निलेश बाळू जगधने व विजय उर्फ पिंटूनाना दत्तू साळवे (दोघेही रा. क्रांतीचौक राहुरी) यांच्याविरुध्द आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय उर्फ पिंटूनाना दत्तू साळवे यास उपचारासाठी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.