शाळकरी विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या?; कारण अस्पष्ट

शाळकरी विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या?; कारण अस्पष्ट

कोपरगाव | प्रतिनिधी

अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) कोपरगाव तालुक्यातील (Kopargaon Taluka) रवंदे (Ravande) येथील १६ वर्षीय शाळकरी विद्यार्थी आपल्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, मयुरेश शिवाजी कदम असे आत्महत्या (Suicide) केलेल्या मुलाचे नाव असून तो दहावीत शिकत होता. शाळेतून घरी आल्यानंतर हा प्रकार घडला असून सदर अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

दरम्यान, सदर मुलाला पुढील उपचारासाठी (Treatment) ग्रामीण रुग्णालयात नेले असता त्यास डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे.तसेच या मुलाने आत्महत्या का केली हे मात्र अद्याप अस्पष्टअसून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com