टाकळीमिया (वार्ताहर) -

राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी

4 वाजे दरम्यान घडली. मात्र, आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

अश्फाक पठाण (वय 20) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून तो टाकळीमिया येथील कारवाडी परिसरात आपल्या आईसमवेत राहत होता. दररोजच्या प्रमाणे मुलगा घरी आला नाही म्हणून त्याचा गावात शोध घेत असता मुस्लिम कब्रस्तानच्या खोलीत अश्फाक याने गळ्याला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे निदर्शनास आले.

या घटनेची माहिती ताबडतोब पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. मात्र, या मुलाने आत्महत्या का केली? या प्रश्नांची गावात उलट सुलट चर्चा होती. राहुरीचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली देवळाली प्रवरा पोलीस स्टेशनचे पोलीस पुढील तपास करीत आहेत.