विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या

कुठे घडली घटना?
विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या

श्रीरामपूर | प्रतिनिधी

शहरातील मुळा-प्रवरा सोसायटी (Mula-Pravara Society) समोर, चव्हाण हॉस्पिटल (Chavan Hospital) शेजारी असलेल्या सिध्दिविनायक अपार्टमेंटमध्ये (Siddhivinayak Apartment) राहत असलेल्या एका विवाहित महिलेने गळफास घेवून आत्महत्या (Sucide) केली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात (Shrirampur police station) आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सिध्दिविनायक अपार्टमेंटमध्ये राहत असलेल्या माधुरी उमेश बो-हाडी (वय 25) ह्या घरात एकटी असताना गुरुवारी मध्यरात्रीच्या दरम्यान माधुरी या विवाहितेने फ्लटमध्ये गळफास घेवून आत्महत्या केली.

माधुरी काल सकाळी उशिरापर्यत उठल्या नाही म्हणून शेजारच्याना संशय आला. त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी (Police) घटनास्थळी येवून घराचा दरवाजा उघडला असता माथुरीने गळफास घेतल्याचे दिसले. औरंगाबादला (Aurangabad) गेलेल्या तिच्या पतीस याघटनेची माहिती दिली.

पोलिसांनी सदर मृतदेहाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. तिचा पती उमेश बोर्‍हाडी यास पोलिसांनी पोलीस ठाण्यात बोलावून त्याची चौकशी सुरु केली. माधुरीने आत्महत्या का केली याचे कारण कळू शकले नाही.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिलेल्या अहवालानुसार पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com