आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

उचल घेतलेले पैसे दे अन्यथा जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर माझ्या पतीने घाबरून गळफास घेतला. याप्रकरणी मयताच्या पत्नीने तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर आरोप विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, नगर तालुक्यातील चिचोंडी येथे राहणार्‍या फिर्यादी ज्योती बर्डे (वय 27) यांच्या पतीने दत्ता सुरेश बर्डे यांनी भास्कर वामन पूर्ण नाव माहीत नाही (रा.गवखेल, ता. आष्टी) यांच्याकडून काही रक्कम उचल म्हणून घेतली होती. उचलीची रक्कम परत न दिल्यास आरोपी वामन याने दत्तू बर्डेस सोडणार नाही, जीव मारून टाकू, अशी धमकी दिली होती.

दत्तू बर्डे यास टेन्शन आले, त्यांनी गळफास घेतला. त्यांचा मृत्यू झाला, अशी तक्रार दत्तूची पत्नी ज्योती बर्डे यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून आरोपी वामन यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com