विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

भोकर (वार्ताहर)

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शिवारातील सबस्टेशन परीसरातील २३ वर्षीय विवाहीत महिलेने घरात राहत्या गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

श्रीरामपूर-नेवासा राज्यमार्गालगत भोकर शिवारातील महावितरणच्या भोकर सबस्टेशनलगत असलेल्या वस्तीत आईच्या घरात राहत असलेली पुनम रामभाऊ गांगुर्डे या विवाहीत महिलेने काल शुक्रवार दि. २० मे रोजी दुपारच्या सुमारास छप्पराचे आढ्याच्या लाकडाला सुताच्या दोरीने गळफास घेतल्याचे लगतच्या नातेवाईकांच्या लक्षात आले. त्यांनी ओरडा करताच जवळच राहत असलेले सोसायटीचे व्हा. चेअरमन गणेश छल्लारे यांनी छप्पराकडे धाव घेत मदतीचा प्रयत्न केला परंतू तोपर्यंत उशीर झाला होता.

त्यांनी लागलीच पोलीस पाटील बाबासाहेब साळवे व तालुका पोलिसांशी संपर्क करून पुढील कारवाई केली. तालुका पोलीस ठाण्याचे पो. हे. कॉ. रविंद्र पवार व पोलीस मित्र बाबा सय्यद घटनास्थळी हजर होत त्या महिलेचा मृतदेह साखर कामगार हॉस्पीटलमध्ये हलविण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. काल उशीराने सदर महिलेचा दफनविधी झाला. या महिलेच्या पश्चात आई व बहीण असा परिवार आहे.

सदर महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार तालुका पोलिस ठण्यात अकस्मात मृत्यू र.न. १८/२०२२ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो. नि. मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. रविंद्र पवार हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com