पैशासाठी त्रास दिल्याने एकाची आत्महत्या

जेऊरमधील घटना || दोघांविरूध्द गुन्हा
पैशासाठी त्रास दिल्याने एकाची आत्महत्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पैशासाठी फोन करून त्रास दिल्याने एकाने आत्महत्या केली. अविनाश अशोक पवार (रा. जेऊर बायजाबाई, ता. नगर) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. अविनाश यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेश पाटील व राजू कचरे (दोघे रा. शेवगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. मयताकडे सापडलेल्या चिठ्ठीमध्ये दोघांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. याबाबत मयत अविनाश यांचे भाऊ अजय अशोक पवार (रा. जेऊर बायजाबाई) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे भाऊ अविनाश पवार यांनी फोनवरून कर्ज घेतले होते. त्यापोटी संशयित आरोपींना अविनाश यांनी वेळोवेळी पैसे दिले होते. असे असताना संशयित आरोपी यांनी अविनाश यांच्याकडे पैशांसाठी तगादा लावला होता. पैसे देऊनही आरोपींनी फोन करून मयतास मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून अविनाश यांनी शुक्रवारी (दि. 18) दुपारी दोन वाजेच्या सुमारास घरासमोरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com