नेवाशाच्या व्यक्तीची नगरजवळ आत्महत्या

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास
नेवाशाच्या व्यक्तीची नगरजवळ आत्महत्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

लिंबाच्या झाडाला गळफास घेत एकाने आत्महत्या केली. दत्तात्रय हरिभाऊ पोहळे (वय 55, मूळ रा. खरवंडी ता. नेवासा, हल्ली रा. बोल्हेगाव, अहमदनगर) असे आत्महत्या करणार्‍या व्यक्तीचे नाव आहे. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान पोहळे यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आले नसून पोलीस तपास करत आहेत.

पोखर्डी (ता. नगर) शिवारातील आकाश हॉटेलच्या समोर गणपती मंदिराशेजारी लिंबाच्या झाडाला दत्तात्रय पोहळे यांनी गळफास घेतला. बुधवारी सकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास ही बाब निदर्शनास आली. दत्तात्रय यांना शिवम दत्तात्रय पोहळे यांनी उपचार करणे कामी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान दत्तात्रय हे उपचारापुर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोहळे यांनी कोणत्या कारणातून गळफास घेतला याचा तपास पोलीस नाईक कावरे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com