सुगावात एकाच कोविड सेंटरचे दोन वेळा लोकार्पण

सुगावात एकाच कोविड सेंटरचे दोन वेळा लोकार्पण

रंगले मानापमान नाट्य : राजकीय चढाओढीची चर्चा

अकोले |प्रतिनिधी| Akole

तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक, शिक्षकेतर कर्मचारी, महाविद्यालयीन प्राध्यापक, दानशूर व्यक्ती व सहकारी संस्था यांचे सहकार्याने उभारलेल्या सुगाव खुर्द येथील कोविड सेंटरच्या लोकार्पण सोहळ्यात राजकीय मानापमानाचा खेळ रंगला. त्यामुळे दोन वेळा सेंटरच्या लोकार्पणाचा प्रकार घडला.

50 ऑक्सिजन बेडची सुविधा असणार्‍या या सेंटरच्या उद्घाटनासाठी पद्मश्री राहीबाई पोपेरे, समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख, आ.डॉ. किरण लहामटे, माजी आमदार वैभव पिचड आदींना आमंत्रित करण्यात आले होते. आ.लहामटे कार्यक्रमस्थळी वेळेवर आले. मात्र तोपर्यंत अन्य मान्यवर पोहचले नव्हते. नाचणठाव येथील उपोषण सोडण्यास जाण्याचे कारण देत आ.डॉ.लहामटे यांनी पाहुणे येण्याआधीच सेंटरचे लोकार्पण केले. पाहुणे आल्यावर पुन्हा उद्घाटन करुन घ्या, असे सांगण्यासही ते विसरले नाहीत.

काही वेळाने पद्मश्री राहिबाई पोपेरे व निवृत्ती महाराज देशमुख यांचे आगमन झाले. मग माजी आमदार वैभव पिचड, जि.प. सदस्य तथा सुगाव रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष कैलास वाकचौरे, भाजप नेते जालिंदर वाकचौरे, अ‍ॅड. वसंतराव मनकर व अन्य मान्यवरांच्या हस्ते पुन्हा फित कापण्यात आली. तसेच ऑक्सिजन प्लान्टचे उदघाटनही करण्यात आले.

तालुक्यातील सर्वपक्षीय युवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी विविध शिक्षक संघटना, दानशूर व्यक्ती, पतसंस्था चालक यांच्या मदतीने सेंटरची कल्पना साकार केली. मात्र उद्घाटनप्रसंगी घडलेला प्रकाराने वेगळी चर्चा झाली. घडला तो प्रकार घडायला नको होता. कुणालाही डावलून उद्घाटनाचा प्रयत्न नव्हता, असे युवा स्पष्टीकरण देण्याची वेळ स्वाभिमानीचे संस्थापक महेश नवले यांच्यावर आली. यापुढे कोणतेही मतभेद न होता या केंद्राला पुढेही सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

शिक्षक प्रतिनिधी राजेंद्र सदगीर यांनी अकोले तालुक्यातील शिक्षकांच्या दृष्टीने हा आनंदाचा क्षण असल्याचे संगीतले. शिक्षक समन्वय समितीचे सदस्य घनश्याम माने यांनी शिक्षकांना काही मर्यादा आहेत. यापुढे प्रशासनाकडे कोविड सेंटरचे व्यवस्थापन देत आहोत. कुणीही राजकारण करु नये, असे आवाहन त्यांनी केले.

तहसिलदार मुकेश कांबळे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय घोगरे, डॉ. इंद्रजित गंभीरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्यामकांत शेटे, मंडलाधिकारी बाबासाहेब दातखीळे यांच्यासह जिल्हा बँकेेचे माजी अध्यक्ष सिताराम पाटील गायकर, माकपचे नेते डॉ. अजित नवले, हभप दीपक महाराज देशमुख, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, युवक तालुकाध्यक्ष रवींद्र मालुंजकर, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, नगरसेवक परशुराम शेळके, रोटरी क्लब अध्यक्ष सचिन शेटे, अगस्तिचे संचालक महेशराव नवले, प्रदिप हासे, दत्ता नवले, नितीन नाईकवाडी, शिवाजी नेहे, हेमंत दराडे, अमोल वैद्य, गणेश आवारी, अजय वर्पे, संदीप शेणकर, सचिन खरात, रामहरी तिकांडे, भाऊपाटील नवले, रमेश जगताप, संदीप शेटे, अशोक भळगट, विक्रम नवले, राजेंद्र गोडसे, प्रा. डॉ.संजय ताकटे, राज गवांदे, राहुल देशमुख, किरण चौधरी, आत्माराम रंधे, सुगाव सरपंच शुभांगी वैद्य, उपसरपंच डॉ.धनंजय वैद्य, सुगाव सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब वैद्य, अ‍ॅड. बी. जी. वैद्य, शांताराम वैद्य, चंद्रकांत पवार यांचेसह शिक्षक प्रतिनिधी व विविध सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

माजी आमदार वैभव पिचड 2 लाख, अगस्ति कारखान्याचे उपाध्यक्ष सिताराम गायकर यांचे 2 लाख, कैलास वाकचौरे 1 लाख, बुवासाहेब नवले पतसंस्था 1 लाख, प्रवरा क्लॉथ 51 हजार, धनश्री पतसंस्था 1 लाख, जनलक्ष्मी पतसंस्था 1 लाख, भाऊपाटील नवले 51 हजार, अशोक भळगट 51 हजार, दूधगंगा पतसंस्था 51 हजार, अर्थवेद पतसंस्था 51 हजार, अगस्ति पतसंस्था 1 लाख, जिल्हा बँक कर्मचारी 1 लाख, खंडेश्वर देवस्थान विश्वस्त मुरलीधर हासे 1 लाख, राजेश पाडेकर 25 हजार, अकोले तालुका शिवसेना 51 हजार, जाणता राजा प्रतिष्ठान 1 लाख 11 हजार, अविश्यर बागुल 1 लाख, आ. डॉ. किरण लहामटे 15 बेड, उत्कर्षा रुपवते यांच्याकडून 50 गाद्या, एलआयसीचे विकास अधिकारी श्रीनिवास वाणी व विमा प्रतिनिधी टीमकडून यांचे 16 सीसीटीव्ही कॅमेरे, हिंदी अध्यापक मंडळाकडून टीव्ही संच यांनीही कोविड सेंटरसाठी मदत उभारली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com