
आश्वी |वार्ताहर| Ashwi
संगमनेर तालुक्यातील चिचंपूर शिवारात शनिवारी दुपारी लागलेल्या आगीमध्ये ऊस तोडणी मंजुराच्या चार कोप्या, त्यामधील जीवनावश्यक वस्तूसह तीन दुचाकी व रोख रक्कम जळून गेल्याने या गरीब कुटुंबाचे मोठे अर्थिक नुकसान झाले.
याबाबत चिचंपूरचे पोलीस पाटील अशोकराव थेटे याच्याकडून मिळालेली माहिती अशी की, चिचंपूर शिवारात पद्मश्री विखे पाटील कारखाण्याचे ऊस तोडणी मंजुर हे कोप्या करुन राहत आहेत. शनिवारी दुपारी अडीज वाजेच्या सुमारास महावितरणच्या तारामध्ये घर्षण होऊन पडलेल्या थिणग्यामुळे याठिकाणी असलेल्या कोप्याला भिषण आग लागली. यामुळे कोप्यासह आतील संसार उपयोगी साहित्य, धान्य, किराणा सामान, रोख रक्कमेसह तीन दुचाकी जळून खाक झाल्या.
या आगीमध्ये दारासिंग लक्ष्मण पवार यांची एक दुचाकी, संसार उपयोगी साहित्य व रोख रक्कम 12 हजार रुपये, रामेश्वर बन्सीलाल चव्हाण यांची एक दुचाकी, संसार उपयोगी साहित्य व रोख रक्कम 11 हजार रुपये, शिवाजी भाऊसाहेब राठोड याची एक दुचाकी, संसार उपयोगी साहित्य व रोख रक्कम 13 हजार रुपये व फत्तू नामदेव राठोड यांचे संसार उपयोगी साहित्य व रोख रक्कम 7 हजार रुपये जळून खाक झाल्याने 33 हजार शंभर रुपये रोख रक्कमेसह मोठे अर्थिक नुकसान या ऊस तोड मंजुराचे झाले आहे.
दरम्यान शनिवारी आग लागताचं परिसरात राहणार्या नागरीकानी आग विझवण्याचा आटोकात प्रयत्नं केला परंतू आग विझवण्यात त्याना यश आले नाही. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच चिचंपूर खुर्दचे पोलीस पाटील अशोकराव थेटे, चिचंपूर बुद्रुकचे पोलीस पाटील दत्तात्रय तांबे, सरपंच विवेक तांबे तसेच प्रवरा कारखाण्याच्या अधिकारी व कर्मचार्यानी घटनास्थळी धाव घेऊन मजुंराचे सात्वंन करत याबाबत माहिती कारखाना प्रशासनाला कळवली. तसेच महसूल व पोलीस प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन या घटनेचा पंचनामा केला आहे.
चिचंपूरकरानी दाखवली माणुसकी
उदरनिर्वाहासाठी आलेल्या या ऊस तोड मजुंराचे या आगीमुळे मोठे अर्थिक नुकसान झाले. संसार उपयोगी साहित्य भस्मसात झाले. त्यामुळे मागील दोन दिवसापासून या कुटुंबातील 20 ते 25 व्यक्तीची जेवणाची पुर्ण व्यवस्था सरपंच विवेक तांबे, अशोकराव थेटे, दत्तात्रय तांबे यानी दोन दिवसापासून केली असून चिचंपूर ग्रामपंचायतीकडून या कुटुंबाना कपडे दिले जाणार असल्याने चिचंपूरकरानी आपल्या कृतीतून मदतीला धावून जाण्याची माणूसकी दाखवली आहे