ऊसतोड कामगारच दरोडेखोर !

म्होरक्या नगर जिल्ह्यातील || गाडी भाड्यासह झालेला खर्च काढण्यासाठी शिजविला कट
ऊसतोड कामगारच दरोडेखोर !

सोलापूर | Solapur

बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) जवळील हिरजे वस्तीवर दरोडा टाकून बाबुराव हिरजे यांचा खून करून त्यांच्या घरातून 75 हजारांचा मुद्देमाल लुटून नेणार्‍या दरोडेखोरांच्या टोळीतील आठपैकी सहाजणांना ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते सर्वजण ऊसतोड कामगार असून एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यांनी काही महिन्यांपूर्वी दर्गनहळ्ळी परिसरात ऊसतोड केली आहे. त्यावेळीच पाटील यांच्या घरावर दरोडा टाकण्याचे ठरविल्याची माहिती समोर आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

दर्गनहळ्ळी रोडवरील हिरजे यांच्या वस्तीवर दरोडा टाकणार्‍या टोळीचा वैभव उर्फ भोरड्या एकनाथ काळे (रा. फकराबाद, जि. नगर) हा म्होरक्या आहे. अजयदेवगण उर्फ देवगण सपा शिंदे, सुनील उर्फ गुल्या सपा शिंदे (दोघेही रा. शेळगाव, ता. परांडा), ज्ञानेश्वर लिंगु काळे (रा. पांढरेवाडी, ता. परांडा), विकास नागेश भोसले (रा. डोकेवाडी, ता. भूम) हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. संतोष झोडगे (रा. डोकेवाडी, ता. भूम) हा त्यांना घेऊन आलेल्या गाडीचा चालक आहे. झोडगे याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

तर काळे आणि देवगण व गुल्या या दोघांची पोलीस कोठडी आज सोमवारी संपणार आहे. त्यांच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. एकाला नगर, दुसर्‍याला बीड तर दोघांना लोणीकाळभोर आणि एकाला भूम येथून अटक करण्यात आली. दरम्यान, ज्ञानेश्वर काळेची पोलीस कोठडी 24 मार्चपर्यंत असून विकास भोसले याला आज न्यायालयात हजर करण्यात आले आहे. दरम्यान, अक्षय काळे रा. पिंपळगाव, ता. जामखेड आणि अनुज उर्फ नागनाथ भोसले (रा. डोकेवाडी, ता. भूम) यांचा शोध सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com