7 हजार 544 ऊस तोडणी कामगारांना ओळखपत्र

जिल्हा परिषद || 56 हजार एकल महिलांची केली नोंदणी
7 हजार 544 ऊस तोडणी कामगारांना ओळखपत्र

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

स्वांतत्र्यांचा अमृतमहोत्सव अंतर्गत 1 ते 15 ऑगस्टदरम्यान जिल्हा परिषदेने अमृत पंधरवडा राबवला. यामध्ये झेडपीच्या प्रत्येक विभागाने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत त्या उपक्रमात घेतलेले उद्दिष्टपूर्ण केली असून यात समाज कल्याण विभागाने जिल्ह्यातील 7 हजार 544 ऊस तोडणी कामगारांना ओळखपत्र दिले आहेत. तर माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण विभागाने कोविडमध्ये एकल झालेल्या सव्वा सात हजार विद्यार्थ्यांना शोधून त्यांची, तर आरोग्य विभागाने 55 हजार 670 एकल महिलांची नोंदणी पूर्ण केली आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या संकल्पनेतून यंदा स्वांतत्र्यांचा अमृतमहोत्सव अंतर्गत 1 ते 15 ऑगस्टदरम्यान झेडपीत अमृत पंधरवाडा राबविण्यात आला. यासाठी प्रत्येक विभागाला आणि विभाग प्रमुखांना उद्दिष्ट देण्यात आले होते. यात रोजगार हमी विभागाने नेरगा अंतर्गत 450 शाळा-अंगणवाड्यांना जैविक कंपाऊड तयार करण्यात आले आहे. मागील आठवड्यात एकाच दिवशी अर्धा तासाता 75 हजार वृक्ष लागवड केली. तसेच 28 अंगणवाडयाचे नरेगामध्ये कनव्हर्जन करुन त्यांची अंदापत्रके तयार केली.

शिक्षण विभाग प्राथमिक व माध्यमिक विभागाने कोविडमध्ये एकल झालेल्या 7 हजार 216 एकल असलेल्या विदयार्थाचा शोध घेऊन त्यांची नोंदणी केली. पाणी पुरवठा विभागाने 570 पेक्षा जास्त गांवामध्ये हर घर जल योजनेचा लाभ दिला. संपूर्ण स्वच्छता विभागाने 100 जास्त गावामध्ये ओडिएफ प्लसचे (हागणदारी मुक्ती) काम पुर्ण केले. कामगार विभाग व ग्रामपंचायत विभाग, यांच्या संयुक्त प्रयत्नाने 1 हजार 526 कामागांराची जेवणाची व्यवस्था करणेत आली.

तसेच 55 हजार 670 एकल महिला यांची नोंदणी केली. जिल्हा स्तरीय व तालुकास्तरीय कार्यालयाचे अभिलेख वर्गीकरण या अभियांना अंतर्गत 4 हजार 507 नस्ती वर्गीकरण करुन अभिलेखामध्ये पाठविण्यात आल्यात. तसेच नष्ट करावयाच्या एकूण नस्त्यांपैकी 682 नस्त्या नष्ट करणेची प्रक्रीया सुरु करणेत आली. एकात्मिक बाल विकास प्रकल्पाअंतर्गत 5 हजार 634 अंगणवाडी केंद्राचे अ 263, ब 1325, क 1737 व ड 2 हजार 309 असे श्रेणीकरण पुर्ण करण्यात आले. तसेच शुन्य ते 6 या वयातील सॅम श्रेणीतील 298 व मॅम श्रेणीतील एकुण 2 हजार 222 बालकाची आरोग्य तपासणी करण्यात आली.

जिल्ह्यातील अंगणवाडी परिसरात 14 हजार 790 शेवग्यांचे झाड लावण्यात आले. 9 बाला अंगणवाडी स्थापना करण्यात आली. 150 पैकी 126 शाळांना लोकसहभागातून शुध्द पाणी पुरवठा व इतर भौतिक सुविधा पुरविणे कामे पुर्ण व उर्वरित प्रगतीपथावर आहेत. प्राथमिक शिक्षण विभागाने नवोदय इयत्ता 3 व 4 चे पुस्तके तयार केली आहेत. आरोग्य विभागाने प्रधानमंत्री मातृत्ववंदन योजनेचा तिसरा टप्पा मधील 3 हजार 77 पैकी 2 हजार 738 ना लाभ देण्यात आला 600 वर्षावरील 1 लाख 955 नागरीकांना बुस्टर डोस लसीकरण करण्यात आले. कृषी विभागाने महाडिबीटी मार्फत वैयक्तिक 428 लाभार्थीचे कागदपत्रे पुर्ण करण्यात आले. तसेच जिल्हयामध्ये शेतकर्‍यांना यांना बांधावर खत वाटप करणे हि नाविन्यपुर्ण योजना राबविण्यात आली.

पशूसंवर्धन विभगाने 51 पशु आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली होती. लघू पाटबंधारे विभागाने जलशक्ती अभियानांतर्गत ठरविण्यात आलेले उदिष्ट 45 बंधारे पुर्ण करणेत आली. 276 कोल्हापुर बंधारा गेटचा शोध घेऊन त्याचे बाबत अहवाल सादर करणेत आला. स्वच्छता विषयक व जलजीवन मिशनचे कामासाठी जिल्ह्यात जनजागृतीसाठी रथ यांत्रेचे आयोजन करण्यात आले जिल्ह्यातील 90 शाळा-अंगणवाडी यांचे इमारतीस रेन वॉटर हॉर्वेस्टीग करण्यात आले आहे. जिल्हयातील नव्याने बांधकाम झालेली सर्व शासकिय इमारतीचे तपासणी करुन गळती असलेल्या इमारतीचे दोष निवारण कालावधीत दुरुस्ती अंतर्गत 105 इमारतीचे छताचे वाटर प्रुफींग करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com