ऊसतोड कामगाराच्या अडीच वर्षांच्या बालकाचा गाडीखाली चिरडून मृत्यू

ऊसतोड कामगाराच्या अडीच वर्षांच्या बालकाचा गाडीखाली चिरडून मृत्यू

लोणी |वार्ताहर| Loni

प्रवरानगर-पाथरे रस्त्यावर ऊसतोड कामगाराचा अडीच वर्षाचा मुलगा रस्त्याच्या कडेला खेळत असताना भरधाव बोलेरोने त्याला चिरडल्याने त्याचा मृत्यू झाला. विखे कारखान्याकडे ऊसतोड कामगार म्हणून काम करणारे सागर संभाजी जगताप रा.कानडगाव ता.राहुरी यांचा अडीच वर्षांचा मुलगा सार्थक मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास प्रवरानगर जवळच पाथरे रोडवरील भंडारी वस्तीजवळ रस्त्याच्याकडेला खेळत असताना भरधाव वेगाने आलेल्या बोलेरो एम एच 17बी वाय 0304 च्या चालकाने सार्थकला जोराची धडक दिली.

सार्थक गाडीच्या चाकाखाली सापडल्याने त्याचा चिरडून मृत्यू झाला. कुणाला काही कळण्याच्या आतच बोलेरोचा चालक पळून गेला. सागर जगताप यांच्या फिर्यादीवरून लोणी पोलिसांनी बोलेरो व चालक दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com