
नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ऊस वाहतूकदाराची 31 ऊस तोडणी मुकादमांनी दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली असून याबाबत ऊस वाहतूकदाराच्या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात 31 जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत ज्ञानेश्वर सर्जेराव सांगळे (वय 42) व्यवसाय- ऊस वाहतुकदार रा. भेडा बुद्रुक यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, मी स्वतः चे ट्रक वाहन खरेदी करुन अहमदनगर जिल्ह्यातील कारखान्यांना ऊस वाहतुक व तोडणीसाठी देत असतो, त्यासाठी कारखाना प्रशासन आमचे वाहनासोबत करार करून त्यावर तोडणी मुकादमाला देण्यासाठी पैसे देत असता, ही रक्कम ट्रकचा मालक म्हणून जबाबदारी ही आमच्यावर असते. या सबंधी कारखाना आमचे वाहन एक प्रकारे गहाण ठेवून घेत असतो.
अॅडवान्स म्हणून मिळालेली रक्कम ही आम्ही ऊस तोडणी मुकादम म्हणजेच त्या ऊस तोडणीचा प्रमुख याला अॅडव्हान्स म्हणून देत असतो. मी सन 2016-2017 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील वृध्देश्वर सहकारी साखर कारखाना अदिनाथ नगर ता. पाथर्डी या कारखान्या सोबत करार केलेला होता. त्यानुसार माझ्या मालकीचे वाहन कारखान्यास गहाण दिलेले होते.
राजु प्रभु राठोड रा. राहुवाडी तांडा पोस्ट चिचखंड ता. अंबड जि. जालना याने चार लाख रुपयांची आर्थिक फसवणुक करून माझा विश्वासघात केला आहे. तसेच माझ्यासोबतचे माझे सहकारी साथीदार ऊस वाहतुकदार याची सुध्दा अशाच प्रकारे मुकादम यांनी फसवणूक केलेली आहे.
माझी 1) राजु प्रभु राठोड ता. अंबड जि.जालना, तसेच इतर सहकारी साथीदार ऊस वाहतुकदार यांची 2) प्रेमदास नथ्थू पवार रा. लोंझे ता. चाळीसगाव (जि. धुळे), 3) गोकुळ छबु राटांड़ कोळवाडी ता. कन्नड 4) जावेद राजु तडवो, 5) रहोम टेलर दोघे रा. फतेपुर ता. जामनेर जि. जळगाव 6) विठ्ठल लाला राठोड रा. शिरसाळा तांडा ता. सिल्लोड, 7) कनीराम धन्नू राठोड रा. शिरसाळा तांडा, 8) श्रावण उखा राठोड रा. वरखेडी ताडा ता. सोयगाव, 9) आनंदा चिंतामन मोरे, 10) गौतम आनंदा मोरे दोघे रा. गुढे ता. भडगाव जि. जळगाव, 11) श्रावण विरभान सुर्यवंशी, 12) अनिता श्रावण सुर्यवंशी, 13) दीपक सीताराम गायकवाड तिघे रा. मेहदळ ता. भडगाव जि. जळगाव, 14) सतिष नाना जाधव रा. आंबेलोहळ ता. गंगापूर संभाजीनगर, 15) काशीनाथ हरी चव्हाण रा. शिरसाळा तांडा) ता. सिल्लोड, 16) जगन्नाथ जवाहरलाल जाधव, 17) अंकुश जाधव रा. वरखंडी ता. सोयगाव, 18) लक्ष्मण परसराम आहेर रा. पेंडेफळ ता. वैजापूर, 19) योगेश प्रभु राटांड रा. डोणगाव ता. पैठण, 20) दिलीप प्रभू चव्हाण रा. डोणगाव ता. पैठण, 21) भगवान धनसिंग राठोड रा.लिभोरी तांडा भडगाव ता. पाचोरा. जि. जळगाव, 22 ) शेषराव हरी चव्हाण रा. सुशी तांडा गेवराई जि. बीड, 23) बळीराम हरीदास चव्हाण रा. जंगलीतांडा ता. सोयगाव,24) पिंटु हुका अहिरे रा. चांवगाव ता.जि. धुळे, 25) संतोष प्रेमसिंग चव्हाण रा. नादातांडा ता. जि. बुलढाणा, 26) हरीश्चंद्र शंकर राठोड रा. कुकडी कारखाना पिंपळगाव पिसा ता. श्रीगोंदा, 27) बळीराम नेमा राठोड रा. तुपेवाडी ता. बदनापूर जि. जालना, 28) भास्कर त्रिवक जाधव रा. चव पिंपळगाव तडेगाव टेंभुणी ता. जाफ्राबाद जि. जालना. 29) साहेबराव किसन मोकासरे, 30). संजय साहबराव मोकासरे दोघे रा. जळकी ता. सिल्लोड, 31) विष्णु गबरू चव्हाण रा. अब्दुलपूर तोड़ा जि. संभाजीनगर यांचे विरुद्ध फिर्याद आहे.
या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात 31 जणांविरुद्ध कलम 420, 406, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात पुढील तपास करत आहेत.