धक्कादायक : ऊसाला तोड मिळत नसल्याने शेतकर्‍याने ऊस पेटवून देत केली आत्महत्या

धक्कादायक : ऊसाला तोड मिळत नसल्याने शेतकर्‍याने ऊस पेटवून देत केली आत्महत्या

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

ऊसाला तोड मिळत (Sugarcane Harvesting) नसल्याने हतबल झालेल्या शेतकर्‍याने (Farmer) ऊस पेटवून (Sugarcane Fire) देत विषारी औषध (Toxic Drug) घेवून आत्महत्या (Suicide) केल्याची खळबळजनक घटना जोहरापूर (Joharapur) ता. शेवगाव येथे घडली. जनार्धन सिताराम माने (वय 70) असे या दुर्देवी शेतकर्‍याचे नाव असून पोलीसांनी (Police) अकस्मात मृत्यूची नोंद (Record of Sudden Death) केली आहे. या घटनेने तालुक्यातील अतिरीक्त ऊस तोडीचा प्रश्न गंभीर बनला असून साखर कारखान्यांच्या (Sugar Factories) विरोधात शेतकर्‍यांमधून संताप (Anger from Farmers) व्यक्त होत आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, जोहरापूर (Joharapur) येथील शेतकरी जनार्धन माने यांचा पावणेतीन एकर ऊस खामगाव (Khamgav) शिवारात गट नंबर 9 मध्ये आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे (Flood) माने यांचा ऊस बाधीत झाला होता. त्यामुळे सरकारचा निर्णयानुसार पूर क्षेत्रातील ऊसाला प्राधान्याने तोड मिळणे आवश्यक होते. मात्र ऊसतोडणीचा (Sugarcane Cutting) हंगाम संपत आला असल्याने ऊसाला तोड मिळण्यासाठी त्यांनी साखर कारखान्याकडे चकरा मारायला सुरुवात केली. मात्र तरी देखील तोड मिळत नसल्याने हतबल झालेल्या माने यांनी काल मंगळवार दि. 5 रोजी दुपारी 2 च्या सुमारास ऊस पेटवून देत शेतात विषारी औषध प्राषण केले. त्यांना तातडीने शेवगाव येथील नित्यसेवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मात्र उपचारा दरम्यान त्यांचे आज बुधवार दि. 6 रोजी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परीवार आहे. दरम्यान तालुका चार कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात येत असतांना देखील शेतकर्‍यांच्या ऊसाला तोड मिळत नाही. मोठया मेहनतीने पिकवलेला ऊस तोडणीसाठी कारखान्याकडे वडीलांनी खुप वेळा गयावया केली. मात्र त्यांना यश आले नसल्याने त्यांनी हतबल होवून हा टोकाचा निर्णय घेतल्याचा आरोप मयत माने यांचा मुलगा संतोष माने याने केला. याबाबतचा जबाब त्यांनी पोलीस ठाण्यात (Police Station) दिला. पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पो. काँ. रामेश्वर घुगे हे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com