ऊस तोडणीसाठी काळानुरूप बदल स्वीकारावे लागतील- आमदार काळे

ऊस तोडणीसाठी काळानुरूप बदल स्वीकारावे लागतील- आमदार काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

मागील दोन ते तीन वर्षापासून समाधानकारक पर्जन्यमान होत असल्यामुळे कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यक्षेत्रात ऊस लागवडी मोठ्या प्रमाणात झाल्या. ऊस आणण्यासाठी कार्यक्षेत्राबाहेर जावे लागणार नसले तरी ऊस तोडणी मजुरांची जाणवत असलेली टंचाई लक्षात घेता भविष्यात ऊस तोडणीसाठी काळानुरूप बदल स्वीकारावे लागतील, असे प्रतिपादन गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनी व गौतम केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांनी केले.

गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनी व गौतम केन ट्रान्सपोर्ट कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. आ. काळे म्हणाले, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या गळीत हंगामाची पूर्वतयारी सुरु असून ऊस तोडणीसाठी वाहतूक कंत्राटदार यांना आगाऊ आर्थिक पुरवठा केला आहे. मात्र मागील काही वर्षापासून जाणवत असलेले ऊस तोडणी मजुरांचे संकट यावर्षी देखील जाणवणार आहे.

मागील गळीत हंगामात फेब्रुवारी महिन्यात उष्णतेमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे ऊस तोडणी मजुरांची कार्यक्षमता कमी होऊन त्याचा परिणाम ऊस तोडणीवर झाला होता. तरीदेखील नोंदविलेल्या सर्व उसाचे वेळेत गाळप केले. परंतु भविष्यातील ऊस उपलब्धता पाहता यांत्रिकीकरणाची मदत घ्यावी लागेल. त्यामुळे ट्रक्सधारकांनी एकत्र येऊन केन हार्वेस्टर खरेदी करावेत व शेतकी विभाग व तोडणी मुकादम यांच्या भरवशावर न राहाता स्वत:च्या टोळ्या ऊस तोडणीसाठी तयार कराव्या, असे आवाहन केले.

प्रास्ताविक संचालक दिलीपराव शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन जनरल मॅनेजर संतोष पवार यांनी तर आभार संचालक विजयराव जाधव यांनी मानले. यावेळी काळे कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे, संचालक सुधाकरराव रोहोम, राजेंद्र घुमरे, सचिन चांदगुडे, वसंतराव आभाळे, शंकरराव चव्हाण, राहुल रोहमारे, शिवाजीराव घुले, सुनील मांजरे, श्रीराम राजेभोसले, डॉ. मच्छिंद्र बर्डे, मनोज जगझाप, अशोक मवाळ, गोरक्षनाथ जामदार, अ‍ॅड. एस.डी. औताडे, अ‍ॅड. विद्यासागर शिंदे, अ‍ॅड. डी. जी. देवकर, देवकर, कार्यकारी संचालक भिकाजी सोनवणे, विजयराव जाधव, कैलास आहेर, विक्रम मांढरे, सुभाष गवळी, वाल्मिकराव कोळपे, मारुती विघ्ने, रंगनाथ घोटेकर, ज्ञानेश्वर हाळनोर, कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, बी.बी. सय्यद, शेतकी अधिकारी कैलास कापसे उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com