आधुनिक युगात ऊस तोडणी मजुरांच्या कोप्यातही झाले नवे बदल

आधुनिक युगात ऊस तोडणी मजुरांच्या कोप्यातही झाले नवे बदल

राजुरी |वार्ताहर| Rajuri

आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आम्हीही मागे नाही हे ऊस तोडणी मजूर त्यांच्या कोप्या जुन्या पद्धतीने बांधण्याऐवजी

आता नव्या पद्धतीने लोखंडी अँगलच्या साह्याने करून त्या कारखाना स्थळावर घेऊन येत असतानाचे चित्र सध्या तरी पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखाना स्थळावर पहावयास मिळत आहे.

सध्या नगर जिल्ह्यातील बहुतेक साखर कारखाने सुरू झाले आहेत. बाहेरील जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या ऊस तोडणी मजुरांच्या कोप्या बांबूच्या व विविध लाकडापासून जुन्या पद्धतीने बांधून तयार झालेल्या आहेत. काही ऊस तोडणी मजुरांनी आपल्या कोप्याचे आधुनिक तंत्रज्ञानात बदल करून नव्या स्वरूपात लोखंडी अँगल व गज वापर करून नव्या स्वरूपात कोप्या बनवून आणलेल्या दिसत आहेत.

त्या पूर्णपणे लोखंडी अँगलमध्ये व लोखंडी पाईपमध्ये बनविलेल्या दिसत आहेत. या नव्या आधुनिक पद्धतीमुळे ऊस तोडणी मजुरांच्या कोप्या डिजिटल पद्धतीने झालेल्या पहावयास मिळत आहे. ही कोपी बनवण्यासाठी अंदाजे सहा ते सात हजार रुपये खर्च येत असून त्यावर प्लॅस्टिक बारदाना टाकून ही कोपी बनवली जात असल्यामुळे सध्या तरी प्रवरा कारखाना परिसरात नागरिकांमध्ये आकर्षण बनत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com