
पाथर्डी |प्रतिनिधी| Pathardi
तालुक्यातील भारजवाडी (Bharajwadi) येथे विहिरीमध्ये (Well) रविवारी पोहण्यासाठी (Swiming) गेलेल्या उस तोडणी कामागाराचा मुलगा सुनिल भाऊसाहेब खेडकर (वय 17) याचा पाण्यात बुडून मृत्यू (Water Drowning Death) झाला आहे.
भारजवाडी येथील सुरेश कराड यांच्या मालकीच्या विहिरीमध्ये (Well) पोहण्यासाठी खेडकर व त्याचे मित्र रविवारी सकाळी अकरा वाजता गेले होते. त्यावेळी सुनील व त्याचे सर्व मित्र विहिरीमध्ये पोहत होते. यावेळी विहीरीतील मित्र बाहेर आले मात्र सुनील हा आला नाही. यावेळी मित्रांनी त्याचा विहिरीमध्ये (Well) शोध घेतला. परंतु तो मिळून आला नाही.
मित्रांनी सुनील हा विहिरीत (Well) कुठे दिसून येत नसून तो विहिरीत खाली गेला आहे, अशी माहिती दिली त्यानंतर गावातील लोक व नातेवाईकांनी सुनील खेडकर यांचा विहिरीमध्ये शोध घेतला असता, त्याचा मृतदेह (Dead Body) मोठ्या कालावीनंतर सापडला. त्यानंतर सुनील याला पाथर्डीच्या (Pathardi) उपरुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. नुकताच खेडकर याचा बारावीचा निकाल लागला होता. सुनीलचे आई वडील हे गरीब कुटुंबातील असून ते ऊस तोडणी कामगार (Sugarcane Harvester Worker) आहेत.