विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे उसाला लागलेल्या आगीत शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान!

विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे उसाला लागलेल्या आगीत शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान!

राजुरी |वार्ताहर| Rajuri

राजुरी येथील जुन्या गावाकडिल जाणार्‍या मारुती मंदिराकडे जाणार्‍या रोडच्या कडेला शेतातील उसाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

राजुरी हद्दीतील अनिकेत चारुदत्त गोरे, मनिषा चारुदत्त गोरे, यांच्या गट न 26 मधील 65 गुंठे ऊस व जैन कंपनीचे ठिबक संच जळून नष्ट झाले. शिवाजी बाळासाहेब गोरे यांचे गट न 27 मधिल 60 गुंठे ऊस व जैन कंपनीचे ठिबक संच जळाला. भाऊसाहेब बंडू गोरे यांचे गट नं. 28 मधिल 40 गुंठे तसेच अनुसाया मुरलीधर गोरे 40 गुंठे ऊस जळून खाक झाला आहे. राजगुरू ट्रान्स फार्म कडे जाणार्‍या 11 के व्ही मेन लाईन वर सकाळी 11:45 च्या सुमारास अचानक बार झाल्याने खाली असलेल्या उसाने पेट घेतला. उन्हाची तीव्रता असल्याने आग मोठ्या प्रमाणात भडकली व शेजारील 4 ते 5 एकर ऊस पेटत चालला.

आग आटोक्यात आणण्यासाठी गावातील युवा तरुण मोठ्या संख्येने धावून आले व आग आटोक्यात आणली. तसेच गणेश कारखान्याच्या अग्निशमक बंबाने आग विझवली. अगोदरच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकर्‍यावर विजेच्या खांबावर शॉर्ट सर्किटमुळे ऊस व ठिबक संच जळाल्याने शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट आले आहे. 13-14 महिन्याचे ऊस असल्याने कारखान्याने जळीत उसमध्ये कपात करू नये, व विज वितरण कंपनीकडून ठिबक संच व उसाचे झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, असे शेतकरी एकजुटीने आवाहन करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com