साखर कामगार 12 टक्के वेतनवाढ करारावर स्वाक्षरी

साखर कामगार 12 टक्के वेतनवाढ करारावर स्वाक्षरी

त्रिपक्षीय समितीची अंतिम बैठक संपन्न...

नेवासा | तालुका प्रतिनिधी

राज्यातील साखर कामगारांच्या (Sugar Worker) वेतनवाढ व इतर मागण्यांवर निर्णय घेण्याकरिता नेमण्यात आलेल्या त्रिपक्षीय समितीची अंतिम बैठक आज पुणे (Pune) येथील साखर संकुलात (Sakhar Sankul) संपन्न झाली. साखर कामगार 12 टक्के वेतनवाढ देण्याच्या करारावर समिती सदस्यांनी स्वाक्षरी केली असल्याने शासन निर्णय निघण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आज सोमवार दि. 4 ऑक्टोबर 2021 रोजी पुणे येथे साखर संकुलामध्ये राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे तथा त्रिपक्षीय समितीचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांचे अध्यक्षतेखाली त्रिपक्षीय सदस्यांची अंतिम बैठक संपन्न झाली.राज्यातील साखर कामगारांना दिलेल्या 12 टक्के वेतनवाढीचा अंतिम शासन निर्णय निघण्यासाठी या करारावर सर्व त्रिपक्षीय सदस्यांच्या सह्या आवश्यक असतात, त्या आज प्राप्त झाल्यामुळेशासन निर्णय निघण्याचा मार्ग सुकर झाला असून तो राज्यातील सर्व साखर कारखान्यांना लवकरच प्राप्त होईल.

या बैठकीस कारखाना प्रतिनिधी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, श्रीराम शेटे, राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड, कामगार आयुक्त रविराज ईळवे, अशोक कारखान्याचे भानुदास मुरकुटे, श्रीगोंदा कारखान्याचे राजेंद्र नागवडे, कामगारांचे प्रतिनिधी म्हणून राज्य साखर कामगार फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश आदिक, सरचिटणीस नितीन पवार, कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, कार्याध्यक्ष अविनाश आपटे, शंकरराव भोसले, महासंघाचे सरचिटणीस आनंद वायकर,अशोक बिराजदार , डी.डी. वाकचौरे,राऊ पाटील,नेवासा तालुका राष्ट्रीय साखर कामगार युनियनचे अध्यक्ष अशोकराव पवार, फेडरेशनचे खजिनदार डी.एम. निमसे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com