कॉम्प्रेस्ड बायोगॅस निर्मितीतुन साखर कारखान्यांना १७५० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकते

माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद यांचे सूतोवाच
कॉम्प्रेस्ड बायोगॅस निर्मितीतुन साखर कारखान्यांना १७५० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकते

नेवासा l तालुका प्रतिनिधी l Newasa

प्रतिकूल आर्थिक स्थितीला तोंड देणाऱ्या साखर उद्योगासमोर (Sugar industry) शेतकऱ्यांना 'एफआरपी' (FRP) देण्याचे बिकट आव्हान उभे आहे. अशा वेळी केंद्र सरकारच्या पुढाकारामुळे देशातील साखर कारखान्यांना कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) (Compressed Biogas(CBG)) क्षेत्रात प्रतिवर्षी दीड लाख टन सीबीजी तयार करण्याची संधी मिळते आहे. यातून १७५० कोटी रुपयांचे उत्पन्न कारखान्यांना मिळू शकते असे सूतोवाच माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार (Former Union Agriculture Minister Sharad Pawar) यांनी केले.

सीबीजी (CBG) निर्मितीमधील संधीचा

शोध घेण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने (व्हिएसआय) (Vasantdada Sugar Institute VSI) आयोजित केलेल्या राष्ट्रीय पातळीवरील ऑनलाइन चर्चासत्राचे (Online seminars) उद्घाटन करताना पवार बोलत होते. या ऑनलाइन चर्चासत्रात व्हीएसआय'चे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील (VSI Vice President Dilip Walse Patil), माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil), राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर (Jaiprakash Dandegaonkar), व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे (Prakash Naikanvare), विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे (BB Thombre), साखर आयुक्त शेखर गायकवाड (Sugar Commissioner Shekhar Gaikwad) तसेच देशाच्या साखर उद्योगातील तंत्रज्ञ, अधिकारी सहभागी झाले होते.

शासकीय खरेदीदर ४६ रुपये...

'सीबीजी' धोरणाला प्रोत्साहन देण्याचा भाग म्हणून तेल विपणन कंपन्यांनी (ओएमसी) (Oil marketing companies (OMC)) सीबीजी उत्पादन व पुरवठ्यासाठी 'सतत' योजना आणली आहे. त्यातून देशात पाच हजार 'सीबीजी' प्रकल्प उभे केले जातील. "सरकारने प्रतिकिलो 46 रुपये दराने सीबीजी विकत घेण्याची घोषणा केली आहे. इंधन आयात खर्च (Fuel import costs) २०२२ पर्यंत दहा टक्क्यांनी कमी करण्याकडे केंद्राचे प्रयत्न सुरू आहेत. याकरिता इंधनासाठी वायू वापरण्याचे प्रमाण ६.५ टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे,” असेही पवार यांनी स्पष्ट केले.

'सीबीजी' इंधन स्वस्त...

पवार म्हणाले, की देशात ५४० साखर कारखाने व ४५० आसवानी प्रकल्प आहेत. त्यापैकी १९० कारखाने आणि १२५ आसवानी प्रकल्प महाराष्ट्रात (Maharashtra) आहेत. किमान निम्मे कारखाने 'सीबीजी' क्षेत्रात गेल्यास देशात प्रतिवर्षी पावणेचार लाख टन आणि राज्यात दीड लाख टन 'सीबीजी' तयार होईल. यातून देशाला पावणेदोन हजार कोटी, तर राज्याला 700 कोटी रुपयांचे उत्पन्न दरवर्षी मिळू शकते. याशिवाय आर्थिक विकास व रोजगारनिर्मितीला चालना मिळेल. पेट्रोलपेक्षाही (Petrol) 'सीबीजी' स्वस्त आहे. डिझेल (Disel), पेट्रोलपेक्षाही वाहनांना 'मायलेज' (Mileage) देण्याची क्षमता सीएनजी (CNG), 'सीबीजी'ची असल्याने शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर इंजिन (Tractor engine) या तंत्रावर चालविण्यास संधी आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com