गळीत हंगाम कधी पासून?; आजच्या बैठकीकडे साखर उद्योगाचे लक्ष

गळीत हंगाम कधी पासून?; आजच्या बैठकीकडे साखर उद्योगाचे लक्ष

नेवासा | तालुका प्रतिनिधी

आगामी सन 2021-22 या गळीत हंगामामधील (harvest season) ऊस गाळपाचे (Sugarcane sifting) धोरण ठरविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची महत्वपूर्ण बैठक आज सोमवार दि.13 सप्टेंबर रोजी मुंबईत (Mumbai) होत आहे.

यंदाचा गळीत हंगाम 15 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबर पासून सुरू करायचा याचा निर्णय होणार असल्याने आजच्या मंत्री समितीच्या (Committee of Ministers) बैठकीकडे साखर उद्योगाचे (sugar industry) लक्ष लागून आहे.

येणाऱ्या हंगामात 1096 लाख मे.टन उसाचे (Sugarcane) उच्चांकी गाळप अपेक्षित आहे. त्यादृष्टिने हंगामाची सुरुवात 15 ऑक्टोंबर की 1 नोव्हेंबर पासून करायची याची तारीख निश्चितीसह अन्य महत्वपूर्ण निर्णय बैठकीत अपेक्षित आहेत.

या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Co-operation Minister Balasaheb Patil) व अन्य मंत्री, साखर संघ प्रतिनिधी, साखर आयुक्त शेखर गायकवाड (Sugar Commissioner Shekhar Gaikwad) उपस्थित राहणार आहेत. राज्यातील चालू वर्षाच्या उसाच्या जादा उपलब्धतेमुळे गाळप हंगामास 15 ऑक्टोंबर पासून सुरुवात करण्याची मागणी कारखान्यांकडून होत आहे.

सुरुवातीस उतारा कमी मिळत असल्याने 1 नोव्हेंबरपासून हंगाम सुरू करावा, असाही मतप्रवाह आहे. त्यामुळे हंगामाच्या तारीख निश्चिती आणि एकूणच ऊस गाळप हंगामाच्या नियोजनावर प्राधान्याने चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी, वसंतदादा साखर संस्था, राज्य सहकारी साखर कारखाना संघ, साखर संकूल देखभाल निधी, कामगारांची देणे भागविण्यासाठीच्या कपातीवर चर्चा होऊन निर्णय होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com