कारखान्यांच्या ऊस तोडणी व वाहतूक खर्चाची आकडेवारी जाहीर

गेल्या हंगामात ‘राहुरी’चा सर्वाधिक तर ‘श्रीगोंदा’चा सर्वात कमी खर्च
कारखान्यांच्या ऊस तोडणी व वाहतूक खर्चाची आकडेवारी जाहीर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यातील 200 साखर कारखान्यांच्या गाळप हंगाम 2021-22 च्या ऊसतोडणी व वाहतूक खर्चाबाबतची आकडेवारी साखर आयुक्तालयाने जाहीर केली असून यात ऊस तोडणी वाहतुकीचा सर्वाधिक खर्च राहुरी कारखान्याचा असून तो 1021 रुपये प्रतिटन तर सर्वात कमी प्रतिटन 650 रुपये 75 पैसे इतका खर्च श्रीगोंदा कारखान्याचा आहे.

महाराष्ट्र राज्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांना मागील वर्षाच्या ऊसतोडणी व वाहतूक खर्चाची माहिती व्हावी यासाठी राज्यातील साखर कारखानानिहाय तोडणी व वाहतूक खर्चाबाबतची माहिती उतरत्या क्रमाने प्रसिध्द केली आहे. कारखान्यांचा तोडणी व वाहतूक खर्च जास्त असतो असा आक्षेप सातत्याने विविध शेतकरी संघटनांकडून व्यक्त केला जातो.

या पार्श्वभूमीवर येत्या हंगामात कारखान्यांचा ऊसतोडणी व वाहतूक खर्च हा वाजवी असल्याची खात्री करुन, गाळपास ऊस देताना ऊस उत्पादक शेतकरी यांनी जवळच्या कारखान्याची निवड करावी हा या मागचा उद्देश आहे.

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले की, ऊस (नियंत्रण) आदेश 1967 मधील कलम 2 व 3 मध्ये ऊस दराबाबत तरतूद केली आहे. केंद्र शासनाने दि.31 ऑगस्ट 2021 चे अधिसूचनेद्वारे जाहीर केलेल्या ऊस दराप्रमाणे राज्यातील कारखान्यांनी 2021-22 मधील गाळप हंगामात साखर उतार्‍याप्रमाणे एफआरपी अदा करण्यात येत आहे.

ऊस तोडणी व वाहतूकी पोटी आलेला खर्च हा ऊस पुरवठादार शेतकन्यांच्या रास्त व किफायतशीर दराच्या (एफआरपी) देय रकमेतून कपात करण्यात येतो.

महाराष्ट्र राज्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांना मागील वर्षाच्या ऊसतोडणी व वाहतूक खर्चाची माहिती व्हावी यासाठी राज्यातील साखर कारखानानिहाय तोडणी व वाहतूक खर्चाबाबतची माहिती उतरत्या क्रमाने प्रसिद्ध करण्यात आली आहे.

गाळप हंगाम 2021-22 मधील नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा सरासरी ऊस तोडणी व वाहतूक खर्च

1) राहूरी-1021.00

2) पियुष- 964.12

3) युटेक- 942.00

4) प्रवरानगर-890.58

5) गणेश-866.05

6) जयश्रीराम-848.33

7) संगमनेर- 819.53

8) क्रांती शुगर-810.89

9) वृद्धेश्वर - 797.10

10) अशोक-781.75

11) ज्ञानेश्वर -780.43

12) प्रसाद - 770.69

13) अगस्ती - 765.13

14) कुकडी - 760.74

15) साईकृपा (देवदै)-751

16) गंगामाई - 750.02

17) साईकृपा हि.गाव- 750

18) मुळा- 738.88

19)अंबालिका - 732.48

20) संजीवनी - 731.00

21) केदारेश्वर- 717.99

22) कोळपेवाडी- 668.88

23) श्रीगोंदा - 650.75

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com