साखर कारखान्यांना गाळप परवाना देताना कामगारांचे पगार थकीत नसल्याचा दाखला सक्तीचा करा

साखर कारखान्यांना गाळप परवाना देताना कामगारांचे पगार थकीत नसल्याचा दाखला सक्तीचा करा

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

राज्यातील साखर कारखान्यांना ऊस गाळप परवाना देताना पगार थकीत नसल्याचा दाखला सक्तीचा करावा, खाजगी साखर कारखान्यांना त्रिपक्ष समिती कराराची अंमलबजावणी केल्याशिवाय गाळप परवाना देऊ नये आणि पेमेंट ऑफ वेजेस अ‍ॅक्टची काटेकोर अंमलबजावणी करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनचे सरचिटणीस नितीन पवार यांनी राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचेकडे केली आहे.

महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश आदिक यांचे मार्गदर्शनाखाली सरचिटणीस नितीन पवार यांचे नेतृत्वातील फेडरेशनचे खजिनदार डी. एम. निमसे, संपर्क प्रमुख सुखदेव फुलारी, अशोकराव पवार, संभाजीराव माळवदे, संजय राऊत, अण्णासाहेब गर्जे, आप्पासाहेब शिंदे, सुरेश आरगडे यांचे शिष्टमंडळाने आज सोमवार दि.12 सप्टेंबर रोजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेऊन साखर कामगारांच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले.

या निवेदनात म्हटले आहे की, ऊस उत्पादक शेतकरी जेवढा महत्त्वाचा घटक आहे तेवढाच तोडून आणलेल्या उसाचे प्रत्यक्ष गाळप करून साखर निर्मिती करणारा कामगारही महत्त्वाचा घटक आहे. मात्र शासन व साखर कारखानदार यांचेकडून साखर कामगार नेहमीच दुर्लक्षित राहिलेले आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांना गाळप परवाना देताना कामगारांचे पगार थकीत नसल्याचा दाखला सक्तीचा करण्याची गरज आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com