उसाचे पेमेंट करण्याचे ‘अशोक’ला आदेश द्यावेत

शेतकरी संघटनेची प्रादेशिक सहसंचालकांकडे मागणी
उसाचे पेमेंट करण्याचे ‘अशोक’ला आदेश द्यावेत

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

अशोक सहकारी साखर कारखान्याने (Ashok Co-oprative Sugar Factory) गाळप हंगाम 2020-2021 च्या 1 एप्रिल नंतर गाळपास आलेल्या उसाच्या पहिल्या पेमेंटसह (Sugar cane First Payment) दुसरे पेमेंट किमान 800 रुपये मे.टनाने करावे, असे आदेश (order) कारखाना व्यवस्थापनास देण्यात यावेत, अशी मागणी शेतकरी संघटनेच्यावतीने प्रादेशिक सह संचालक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, अशोक कारखाना व्यवस्थापन समितीने चालू हंगामातील 1 एप्रिलनंतर गाळपास आलेल्या उसाचे पेमेंट गेले तीन महिने उलटूनही अद्याप केलेले नाही. तरी ऊसदर नियंत्रण कायद्याच्या (SugarCane Control Act) अधीन राहून ऊस तुटल्यापासून 14 दिवसांच्या आत देणे बंधनकारक असताना 3 महिने उलटूनही अद्याप ऊस उत्पादकाना पैसे मिळालेले नाहीत. सदर रक्कम व्याजासहित वर्ग करणे कामी आदेश व्हावेत.

करोना संकटात अशोक कारखान्याने (Ashok Factory) 3000 रुपये ग्राह्य धरून उसाचे दुसरे पेमेंट 800 रुपये टनाने तातडीने बँकेत वर्ग करावे. तसेच मागील दीड महिन्यापासून कारखान्याला शासनाचा प्रतिनिधी म्हणून कार्यकारी संचालकपदी पूर्णवेळ अधिकारी नाही. कारखान्याने गत हंगामात उत्पादकांची संमतीशिवाय प्रवरा, गणेश, संगमनेर, युटेक व राहुरी कारखान्याला ऊस दिला. त्यांच्याकडून पेमेंट आले नसल्याने पेमेंट देता येत नाही, असे सांगितले जाते. उत्पादकांनी कामधेनू या नात्याने व्यवस्थापनावर विश्वास ठेवून नोंदी दिल्या.

कारखान्याला सदर नोंदीवर गाळप परवाना मिळाला असताना अशोकच्या मिलमध्ये गाळप होणे अपेक्षित होते. परंतु तसे न होता इतर कारखान्याना ऊस दिला. तरी प्रादेशिक सह संचालक यांनी थकीत उसाचे पहिले पेमेंट (Sugar cane First Payment) व झालेल्या गाळपाचे 800 रुपये दुसरे पेमेंट होणे कामी आदेश देण्यात यावेत, अशी मागणी शेतकरी संघटनेचे अनिल औताडे, युवराज जगताप यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com