ऊस तोडणी मजुरांवर बिबट्याचा हल्ला

ऊस तोडणी मजुरांवर बिबट्याचा हल्ला

अकोले |प्रतिनिधी| Akole

ऊसाच्या फडात ऊसतोडणी करणार्‍या दोन ऊसतोडणी मजुरांवर बिबट्याने अचानक हल्ला चढविला.

अकोले तालुक्यातील वाघापूर शिवारात काल शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली.

यामध्ये मूळचे मालेगाव भागातील असलेल्या दोन ऊसतोडणी कामगारांच्या दोन्ही हाताच्या उजव्या बाजूला आणि बाहूला बिबट्याने केलेल्या हल्ल्यात खोलवर जखमा झाल्या आहेत. शंकरअप्पा मोतीराम पवार आणि संजय काळू सोनवणे हे दोघे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले.

या घटनेची माहिती समजताच वनपरिक्षेत्रअधिकारी श्रीमती भाग्यश्री पोले यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ अकोले येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात येऊन उपचार करण्यात आले. यावेळी श्रीमती पोले यांनी ग्रामीण रुग्णालयात जावून जखमींची विचारपूर सेकील. वनविभागाने या गरीब ऊसतोडणी मजुरांना भरपाई द्यावी अशी मागणी या ऊसतोडणी मजुरांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com