उसाला तुरे येऊ लागल्यामुळे शेतकरी वर्गात चिंता

उसाला तुरे येऊ लागल्यामुळे शेतकरी वर्गात चिंता

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

परिसरातील जळगाव (jalgav), पुणतांबा (Puntamba), रास्तापूर (Rastapur), रामपूरवाडी (Rampurwadi), येलमवाडी (Yelamwadi) यासह गोदावरी नदीकाठच्या (Godavari River) डोणगावसह (Dongav) अनेक गावात उभे असलेल्या ऊस पिकाला तुरे (Sugarcane Crop) येऊ लागल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे (Concerns Among Farmers) वातावरण पसरले आहे.

उसाला तुरे येऊ लागल्यामुळे शेतकरी वर्गात चिंता
हॉटेलमध्ये काम करणारा तरुण आता 25 कोटींचा झाला मालक

विशेषतः ऊस पीक (Sugar Cane Crops) परिपक्व झाल्यानंतर उसाला तुरे येतात. मात्र सध्या 10 ते 11 महिने झालेल्या उसाला सुद्धा तुरे येण्यास सुरुवात झाली आहे. हा हवामानातील बदलांचा परिणाम (The Effects of Climate Change) असल्याचे शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे. तुरे आलेल्या उसाला तातडीने तोड मिळणे गरजेचे असते. तुर्‍यांमुळे उसाचे वजन कमी होते अशी चर्चा आहे. त्यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी उसाची तोड लवकरात लवकर कशी मिळेल यासाठी प्रयत्नशील आहे.

पुणतांबा परिसरात गणेश, संजीवनी तसेच कोळपेवाडी कारखान्यांच्या ऊस तोड कामगाराच्या टोळ्या आहेत. त्यामुळे जो कारखाना लवकरात लवकर ऊस घेऊन जाईल त्या कारखान्याच्या शेतकी विभागाकडे ऊस तोडीसाठी शेतकरी वर्ग चकरा मारतांना दिसून येत आहे.

उसाला तुरे येऊ लागल्यामुळे शेतकरी वर्गात चिंता
पारनेर नगरपंचायतीच्या ४ जागांसाठी १८ उमेदवारांचे अर्ज दाखल

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com