103 अनुदानित वसतीगृहांची एकाचवेळी झाडाझडती

अहवालातून धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता
103 अनुदानित वसतीगृहांची एकाचवेळी झाडाझडती

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात समाज कल्याण विभागाच्यावतीने चालविण्यात येणार्‍या 103 अनुदानित वसतीगृहाची विशेष बाब म्हणून एकाच वेळी झाडाझडती घेण्यात आली. शुक्रवारी झालेल्या या तपासणीत वसतीगृहातील साधन सामुग्रीसह इमारत, खोल्यातील साहित्य, विजेच्या उपकरणापासून विद्यार्थ्यांसाठी 40 ते 45 दिवस पुरेल ऐवढा अन्नसाठा, पाण्याची व्यवस्था आदी 66 प्रकारची माहिती घेण्यात आली आहे. या तपासणीच्या अहवालात अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून खास बाब म्हणून ही तपासणी करण्यात आली असून एकाच दिवशी एकाच वेळी जिल्हा परिषदेचे 103 अधिकारी यांना या मोहिमेवर धाडण्यात आले होते. यावेळी तपासणी अधिकार्‍यांना वसतीगृहातील विद्यार्थ्यांसोबत भोजन करून तपासणीचा मंगळवारी 11 जानेवारीपर्यंत सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. क्षीरसागर यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात समाज कल्याण विभागाचे 103 अनुदानित वसतीगृहे आहेत. यात अकोले तालुक्यात 14, संगमनेर 9, कोपरगाव 3, श्रीरामपूर 6, राहाता 3, राहुरी 7, पारनेर 7, श्रीगोंदा 4, कर्जत 7, जामखडे 5, शेवगाव 12, नेवासा 5, पाथर्डी 10 आणि नगर तालुक्यात 9 वसतीगृहांचा समावेश आहे. या वसतीगृहाच्या तपासणीत त्या ठिकाणी प्रवेश असणारे विद्यार्थी संख्या, ते कोणत्या प्रवर्गात मोडतात, कर्मचारी संख्या, इमारत भाडोत्री की स्व मालकीची, पक्के बांधकाम की तात्पूर्ता निवारा, इमारतीचे प्रती विद्यार्थी क्षेत्रफळ, गृहपाठासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे की नाही, इमारतीला लोखंडी गेट आहे ? वसतीगृहाचे नामफलक दर्शनी भागावर आहे? परिसारात धुम्रपान निषेधाचा फलक आहे? क्रीडांगण, संरक्षक भिंत, दिव्यांगासाठी काय व्यवस्था आहे,

मुला-मुलींसाठी सर्व व्यवस्था स्वतंत्र आहे?, आंघोळीसाठी गरम पाणी, वसतीगृहात प्रती विद्यार्थी ग्रामीण भाग 125 लीटर आणि शहरी भागात 140 लीटर पाण्याची साठवणूक आहे?, सांडपाणी निचरा, विजेची सोय, प्रत्येक खोलीत पंखे, बल्ब, ट्यूब, एलईडी बल्ब, इंनर्व्हटर, विद्यूत सुरक्षा व्यवस्था, करमणुकीची साधने, बायमेट्रीक हजेरी, तक्रार पेटी, कॉट, गाद्या, पांघरून सोय, टेबल खुर्ची, खिडक्यांना परदे, पिण्याच्या आणि सांडपाण्याच्या टाक्यांची स्वच्छता, स्वयंपाक घर आणि भोजन कक्ष स्वतंत्र आहे?, 40 ते 45 दिवस पुरेल ऐवढा अन्न साठा, दिवसाभरातील आहाराचा मेनू, भोजणाची वेळ, सकस भोजन, मासांहार आणि शाकाहारी भोजन मिळते की नाही आदी 66 प्रकारातील तपासणी यावेळी करण्यात आली आहे. याबाबतच अहवाल मंगळवार (दि.11) रोजी समारे येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com