पाणबुडी मोटार चोरणारे दोघे अटकेत

26 हजारांचा मुद्देमाल हस्तगत
पाणबुडी मोटार चोरणारे दोघे अटकेत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शेतकर्‍यांच्या शेतामधून पाणबुडी मोटार चोरणार्‍या दोघांना भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे. राजू विठ्ठल धायमुक्ते व देविदास अर्जुन दुसंगे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून पाणबुडी मोटारीसह 26 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. प्रतीक मायबा भिंगारदिवे यांच्या शेतामधील पाणबुडी मोटार व इतर साहित्य असा 26 हजार रूपयांचा ऐवज 28 जुलै, 2022 रोजी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता.

याप्रकरणी भिंगारदिवे यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार अजय नगरे हे करत आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार नगरे, राहुल द्वारके, साठे यांच्या पथकाने राजू धायमुक्ते याला कापूरवाडी येथून ताब्यात घेत अटक केली. यानंतर देविदास दुसुंगे याला ताब्यात घेत अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबूली देत मुद्देमाल काढून दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com