महिला मोटार वाहन निरीक्षकाला धमकी

दोन ट्रान्सपोर्ट व्यावसायिकावर गुन्हा
महिला मोटार वाहन निरीक्षकाला धमकी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (Sub Regional Transport Offices) महिला मोटार वाहन निरीक्षक (Women Motor Vehicle Inspector) यांनी केलेल्या कारवाईचा राग मनात धरून त्यांना धमकाविणे (Threat) शहरातील दोन ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना (Transport Professional) चांगलेच महागात पडले आहे. महिला अधिकारी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) दिलेल्या फिर्यादीवरून फिरोज शफी खान व बाबासाहेब बलभीम सानप यांच्यावर धमकाविणे व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी रविवारी (दिनांक 14 मे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिला मोटार वाहन निरीक्षकाला धमकी
प्रेम व्यक्त करत चाकूने हल्ला

आयेशा शेख या येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात (Sub Regional Transport Offices) मोटर वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. नोव्हेंबर 2021 मध्ये जनसेवा ट्रान्सपोर्टची वाहने भार क्षमतेपेक्षा जास्त वाहतुक करीत असल्याने सदर वाहनांवर कारवाई केली होती. त्यानंतर 8 मे रोजी राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह निमित्त महालेखाकार कार्यालय कामकाज देण्यात आलेले होते. 8 मे रोजी जनसेवा ट्रान्सपोर्टचे (Transport) वाहणावर ओव्हर लोड बाबत रितसर कार्यवाही केली. सदर कारवाई केल्याचा राग मनात धरून फिरोज खान व बाबासाहेब सानप गेल्या काही वर्षापासून कार्यालयात येऊन नोकरी घालविण्याची वारंवार धमक्या (Threat) देत असल्याचा आरोप फिर्यादीने केलेला आहे.

महिला मोटार वाहन निरीक्षकाला धमकी
कुकडीचे पाणी पेटले; राष्ट्रवादी नेत्याची हातात दगड घेऊन नगरचे नेते आणि कुकडीच्या अधिकार्‍यांना तंबी

8 मे 2023 रोजी खान व सानप यांच्यासह दोन ते तीन अज्ञात इसमांनी माझ्या कार्यालयातील केबीनमध्ये प्रवेश करून कारवाई करायची नाही, अन्यथा तुमची नोकरी घालवू! अशा धमक्या (Threat) दिल्या. शाब्दीक बाचाबाची करून भावनिक छळ केला व करीत असलेल्या शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला.

महिला मोटार वाहन निरीक्षकाला धमकी
शिर्डीतील 6 हॉटेल छापा प्रकरणी 4 मालकावर पिटा अंतर्गत कारवाई

तुमच्या विरूध्द वरिष्ठांकडे केलेल्या तक्रारी मागे घ्यावयाच्या असतील तर तुम्हाला आमच्या सोबत तडजोड करून पैसे द्यावे लागतील तुम्ही आम्हास पैसे दिले नाही तर आम्ही तुमच्या विरूध्द दिलेल्या तक्रारी मागे घेणार नाही, असे म्हणून तेथून सर्वजन निघून गेले असल्याचे फिर्यादीत शेख यांनी म्हटले आहे.

महिला मोटार वाहन निरीक्षकाला धमकी
त्यांनी ऑफर द्यावी, आम्ही सोबत यायला तयार
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com