
संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
विद्यार्थी जीवनात विद्यार्थ्यांनी कलेसोबतच जिद्द, चिकाटी व मेहनत आत्मसात करणे काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या कलात्मक आविष्कारातून त्यांचा सर्वांगिण विकास होतो. छोट्या गोष्टीमधुन विद्यार्थ्यांनी निराश न होता आपल्यातील कलाकार ओळखून यशासाठी जिद्द बाळगावी असे प्रतिपादन संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक निकीता महाले यांनी केले.
संगमनेर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने गायन, नृत्य अशा विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यकारिणी सदस्य केदारनाथ राठी होते. तसेच व्यासपीठावर प्राचार्य प्रो. डॉ.अरुण गायकवाड, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र लढ्ढा, उपप्राचार्य डॉ. रविंद्र ताशिलदार, सांस्कतिक मंडळ कार्याध्यक्ष डॉ.जितेंद्र पाटील, डॉ. बी. एम. पालवे, डॉ. डी. एम. घोडके, विद्यार्थी मंडळ कार्याध्यक्ष डॉ. राजेंद्र वामन, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. दिपक गपले, विद्यार्थीनी प्रतिनिधी कु. झील पांचोली, संध्या कोटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
केदारनाथ राठी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी श्रमप्रतिष्ठा जोपासत कला सादर केली पाहीजे. बाह्यसौंदर्यापेक्षा अंर्तःसौंदर्यामुळे व्यक्तिचे विचार प्रगल्भ होतात आणि ज्यांचे विचार सुंदर असतात त्यांचे आचार पर्यायाने त्यांचे जगणे सुंदर असते. यश मिळविण्यासाठी परिस्थिती कधीच महत्वाची ठरत नसते. त्यासाठी आत्मविश्वास आणि प्रयत्न महत्त्वाचे आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ.अरुण गायकवाड यांनी वर्षभरातील सर्व कला, सांस्कृतिक व इतर उपक्रमांचा आढावा घेतला.
याप्रसंगी विद्यार्थी मंडळातील प्रतिनिधी व वर्ग प्रतिनिधी या सर्वांचा प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला तसेच मान्यवरांच्या हस्ते गायन, नृत्य, मुकनाट्य, मिमिक्री या कलाप्रकारातील स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या गुणी कलावंत विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देवुन गौरव करण्यात आला.
समारंभाचे प्रास्तविक प्रा. डॉ. राजेंद्र वामन, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. जितेंद्र पाटील यांनी केले व पाहुण्यांचा परिचय व सत्कार निवेदन प्रा. डॉ. डी. एम. घोडके यांनी तर आभार प्रा. डॉ. बी. एम. पालवे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. राजू त्रिभूवन, संजय काशिद, भानुदास सोनवणे, ऋषीकेश थोरात, सचिन चौधरी, सुरज सातपुते आदींचे सहकार्य लाभले.