20 हजार विद्यार्थी देणार रविवारी टीईटीची परीक्षा

पोलीस बंदोबस्तामुळे 20 मिनिट आधीच परीक्षागृहात उपस्थित राहण्याचे आवाहन
20 हजार विद्यार्थी देणार रविवारी टीईटीची परीक्षा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रविवार (दि.21) रोजी जिल्ह्यातील 31 केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) (TET) होणार आहे. या परीक्षेसाठी (Exam) 61 परीक्षा राहणार असून परीक्षेसाठी पोलीस बंदोबस्त राहणार असल्याने परीक्षार्थीनी परीक्षा सुरू होण्यापूवी 20 मिनीट आधीच परीक्षा केंद्रात (Examination Center) उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी भास्कर पाटील (Education Officer Bhaskar Patil) यांनी केले आहे.

टीईटीच्या परीक्षा (TET Exam) दोन टप्प्यात पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक दोन अशा पध्दतीने होणार आहे. यात पेपर (Paper) एकसाठी 1 ते 30 आणि पेपर दोनासाठी 30 ते 61 असे परीक्षा केंद्र राहणार आहेत. पेपर एकसाठी 10 हजार 410 विद्यार्थी (Student) राहणार असून पेपर दोनसाठी 9 हजार 704 विद्यार्थी राहणार आहेत. ही परीक्षा (Paper) मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी, कन्नड, तेलगू या भाषातून होणार आहे.

परीक्षेची (Exam) तयारी पूर्ण झाली असून परीक्षेसाठी 15 झोन अधिकारी, 61 केंद्र संचालक, 61 सहायक परीरक्षक, पर्यवेक्षक (प्रति ब्लॉक मागे एक) असे 190 राहणार आहेत. यासह समावेशकांची संख्या ही 843 राहणार असून लिपीकांची संख्या 122, परीक्षेसाठी 144 शिपाई यांची नेमणूक करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी 1 हजार 597 जणांचे मनुष्यबळ राहणार असून यासह परीक्षा केंद्राबाहेर पोलीसांचा बंदोबस्त राहणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी पाटील (Education Officer Bhaskar Patil) यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com